एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या


हुबळी शहरातील आणखी एक घटना
हुबळी
कर्नाटकात कॉलेज युवती नेहा हिरेमथ हत्येनंतर पुन्हा एकदा हुबळी येथे एकतर्फी प्रेमातून युवकानं २१ वर्षीय युवतीची हत्या केली आहे. आरोपी विश्वा उर्फ गिरिश सावंत हा पहाटे ५ वाजता अंजलीच्या घरी पोहचला.अंजलीनं दरवाजा उघडताच गिरीशनं चाकूने तिच्यावर वार केले. त्यानंतर तो पसार झाला. अंजलीच्या बहिणीच्या समोरच ही हत्या झाली गिरिशला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक बनवलं आहे. या घटनेबाबत मृत अंजलीची बहीण म्हणाली की, गिरीश मागील काही काळापासून माझी बहीण अंजलीचा त्रास देत होता. त्याने त्याच्या प्रेमाची कबुली दिली परंतु माझ्या बहिणीनं त्याला नकार दिला. त्याने अंजलीला म्हैसूरला येण्यासाठी दबाव टाकला होता. जर ती आली नाही तर तुझी अवस्था नेहासारखी करेन अशी धमकीही आरोपीने दिली. आम्ही पोलिसांना या धमकीबाबत सूचित केले, परंतु त्यांनी गांभीर्याने घेतले नाही आणि आज माझी बहिणीचा मृत्यू झाला.
आरोपी युवक पहाटे ५ च्या सुमारास मुलीच्या घरी घुसला, त्यानंतर मुलीवर चाकूने वार केले. तितक्यात घरातील इतर सदस्य जागे झाले.त्यांनी युवकाला हल्ला करण्यापासून रोखले परंतु त्या निर्दयी युवकानं तोपर्यंत अंजलीची निर्घृण हत्या केली. त्यानंतर तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला.सध्या पोलीस या युवकाचा शोध घेत आहेत
आरोपी युवकावर चोरीसारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. तो बाईक चोर म्हणून कुप्रसिद्ध होता. आरोपी युवकाकडून अंजलीला सातत्याने त्रास दिला जायचा. त्याबाबत तिच्या कुटुंबानेही पोलिसांना संपर्क साधून त्यांना घडलेल्या प्रकाराबाबत सांगितले होते. पोलिसांनी या तक्रारींची फारशी दखल घेतली असा आरोप कुटुंबाने केला. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. आरोपीविरोधात कठोर कारवाई केली जावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. गिरीश ७ महिन्यापासून अंजलीला त्रास देत होता असं मृत युवतीच्या वडिलांनी सांगितले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!