वार्षिक राशिभविष्य 2025:मिथुन


वार्षिक राशिभविष्य 2025
2025 च्या पोटात काय दडले असेल याची उत्सुकता सगळ्यांना असेल पुढील वर्षी शनी महाराज 29 मार्च 2025 रोजी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करतील त्यामुळे मकर राशीची साडेसाती संपत असून मेष राशीची साडेसाती सुरू होईल 14 मे 2025 रोजी गुरुचा मिथुन राशीत प्रवेश होईल तसेच 18 मे 2025 रोजी राहू आणि केतू यांचाही राशी बदल होईल राहू मीनेतून कुंभ राशीत प्रवेश करेल तर केतू कन्येतून सिंह राशीत प्रवेश करील वार्षिक भविष्य पाहताना वरील मुख्य ग्रहांचे राशी बदल आणि इतर सर्व ग्रहांचे गोचर पाहून राशिफल तयार होते

Advertisement

मिथुन
आव्हानात्मक वर्ष
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष थोडे आव्हानात्मक असणार आहे परंतु नोकरदार व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी हे वर्ष चांगले राहील हे वर्ष आव्हानात्मक असल्याने तुम्हाला प्रत्येक काम हे लक्षपूर्वक आणि जबाबदारीने करावे लागेल तुमच्यामध्ये असलेला व्यावहारिक दृष्टिकोन तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि इतरही सगळीकडे उपयोगी ठरेल कोणत्याही मल्टिनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तींनी नोकरीत अनुकूल परिस्थिती असेल तर नोकरीत बदल करू नये नवीन नोकरीत काम करताना त्रास होण्याची शक्यता आहे सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात बॉस बरोबरही अनेक बाबतीत मतभेद होऊ शकतात कुटुंबात बोलताना विचारपूर्वक बोला वाणीवर नियंत्रण ठेवतानाच इतरांशी बोलताना जास्त प्रतिक्रिया देऊ नका कुटुंबातील व्यक्ती तुम्हाला हवे तसे वागतील अशी अपेक्षा करू नका विवाह इच्छुक तरुण-तरुणींच्या विवाहातील अडथळे दूर होऊन यावर्षी विवाह संपन्न होतील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप मेहनत केल्यानंतर यश मिळेल व्यावसायिक क्षेत्रात असलेल्या व्यक्ती नवीन व्यवसाय सुरू करतील ज्या व्यवसायात तोटा होतोय तो बंद करून नवीन व्यवसाय सुरू करतील या नवीन व्यवसायात त्यांना यश मिळेल प्रेमी जीवनात मात्र बरीच तडजोड करावी लागेल त्यासाठीही विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल प्रेमी जीवनात संबंध टाळले जाऊ शकतात त्यामुळे दुरावा निर्माण होऊ शकतो आरोग्याच्या बाबतीत सतर्क रहा, काळजी घ्या अनेक व्यक्तींना ॲनिमिया दात डोळे यांचे विकार होऊ शकतात तसेच हृदयरोग आणि पोटाचे विकारही होऊ शकतात त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी लागेल 29 मार्च 2025 रोजी शनीचे गोचर तुमच्या राशीच्या दशम स्थानातून होणार आहे त्यामुळे कार्यक्षेत्रात काही अडचणी निर्माण होऊ शकतात पण वरिष्ठांशी वाद न घालता आपले काम करीत राहा काही काळानंतर यश मिळेल 14 मे 2025 रोजी गुरुचे गोचर तुमच्याच राशीतून होणार आहे त्याचा परिणाम म्हणजे तुमच्या विचारात सकारात्मकता येईल त्यामुळे तुमचे मन आणि शरीर कोणतीही प्रतिकूल परिस्थिती सहन करण्यासाठी तयार राहील या काळात अनेकांना सरकारी नोकरी मिळण्याचे योग आहेत विद्यार्थ्यांना या काळात परीक्षेत चांगले यश मिळेल मानसन्मान मिळेल शत्रू तुमच्याकडून परास्त होतील धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल 30 मे 2025 रोजी राहू आणि केतूचे गोचर तुमच्या राशीच्या नवम आणि तृतीय स्थानातून होईल केतूचे गोचर तृतीय स्थानातील होईल ज्यामुळे तुमच्या पराक्रमात वाढ होईल आणि धनलाभही होतील राहूचे गोचर नवमस्थानातून होईल जो तुम्हाला धार्मिक बाबतीत प्रतिकूलता निर्माण करेल परंतु तुम्ही धार्मिक पूजा धार्मिक कार्य यांच्याशी संलग्न रहा दिनचर्या आणि शिस्त पाळा म्हणजे तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील मिथुन राशीसाठी यावर्षी जानेवारी फेब्रुवारी जून आणि सप्टेंबर हे महिने आव्हानात्मक राहतील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!