युनिव्हर्सल नाॅलेज स्कूलमध्ये विविध कार्यक्रम
सातारा
युनिव्हर्सल नाॅलेज स्कूलमध्ये शाळेचे चेअरमन श्री.नितीन माने यांच्या मार्गदर्शनाखाली देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत तसेच ‘गुंतवणूक समारंभ’ देशभक्तीपरक समूह गीत गायन स्पर्धा,’बॅज तयार करणे इ.कार्यक्रम सी.बी.एस.सी कडून राबवण्यात येणाऱ्या ‘नो बॅग डे’या उपक्रमाअंतर्गत स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले.या दरम्यान ‘गुंतवणूक समारंभांद्वारे’ शाळेने नव्याने गुंतवलेल्या विद्यार्थ्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आत्मविश्वास आणि विश्वास दर्शवत उत्तरदायित्व, कर्तव्य पार पाडण्याची शपथ घेतली.’हेड बाॅय’ टिंकू कुमार पंडित,’हेड गर्ल’ अदिती यादव यांनी तसेच विविध समित्यांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी शपथ घेतली.यावेळी शाळेतील महाराष्ट्र राज्य फुटबॉल संघात पदार्पण करणारी विद्यार्थिनी श्रुती धनराज कुंभार हिच्या आई माजी सैनिक धनराज कुंभार यांच्या सुविद्य पत्नी सौ.शुभांगी धनराज कुंभार यांनी प्रमुख पाहुणे म्हणून आपली उपस्थिती दर्शविली.त्याच बरोबर शाळेची माजी विद्यार्थीनी कु.तनिष्का बर्गे हिने विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून उपस्थित दर्शविली. सी.बी.एस.सी कडून राबवण्यात येणाऱ्या ‘नो बॅग डे’ हा उपक्रमही आज घेण्यात आला.प्रमुख पाहुण्या सौ.शुभांगी कुंभार यांनी कृतज्ञता व्यक्त करत आपल्या मौलिक विचारांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी इयत्ता दहावीतील विद्यार्थी विराज करपे याने सूत्रसंचालन तसेच शिक्षक आशीष गायकवाड यांनी आभार प्रदर्शनाचा कार्यभार संभाळला.यावेळी शाळेच्या उपप्राचार्या सौ.रोशनी चंदनखेडे,व्यवस्थापक सौ.नवनिता पटेल,शिक्षक, विद्यार्थी,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
