जनवाचक चळवळीतर्फे पुस्तक वाटप


मामुर्डी येथील श्री केदारेश्वर वाचनालयाला मदत
सातारा
जावळी तालुक्यातील मामुर्डी गावातील श्री केदारेश्वर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाला जनवाचक चळवळीतर्फे पुस्तके भेट देण्यात आली.
यावेळी जनवाचक चळवळीचे मुख्य समन्वयक श्रीराम नानल यांनी वाचनाचे फायदे उपस्थितांना सांगितले. वाचनाने मनाचा ताणतणाव कमी होण्यास मदत होते. शब्दज्ञान वाढते. आणि मन समृद्ध होते असे ते म्हणाले.
जनवाचक चळवळीचे सहसमन्वयक किरण गाडे यांनी जनवाचक चळवळ कशाप्रकारे राबवली जाते याची माहिती उपस्थितांना दिली. शहरातून खूप मोठ्या संख्येने नागरिक पुस्तके देण्यासाठी पुढे येत आहेत असे त्यांनी सांगितले. आज भेट देण्यात आलेली पुस्तके पुण्याच्या सौ रेवती गोगटे, बिपिन पंडित तसेच लातूरचे प्रख्यात कवी भारत सातपुते यांनी दिलेली आहेत.
या कार्यक्रमासाठी श्री केदारेश्वर सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ. रूपाली सुनील धनावडे, किसन धनावडे, श्रीरंग धनावडे, सोपान धनावडे, सौ दिपाली धनावडे तसेच मेढा येथील वाचनालयाचे संचालक नारायणराव शिंगटे गुरुजी आणि सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव देशपांडे उपस्थित होते.
असे पुस्तके भेट देण्याचे कार्यक्रम मेढा येथील सार्वजनिक वाचनालय, बामणोली तर्फे कुडाळ येथील वाचनालय तसेच रामवाडी येथील वाचनालय येथेही
संपन्न झाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!