१९ मे पासून ‘या’ राशी होणार श्रीमंत


१२ वर्षांनी दोन ग्रहांच्या युतीने शुभ योग
सातारा
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या गोचरचा प्रत्येक राशींच्या व्यक्तींवर परिणाम होतो. काही दिवसातच देवगुरु वृषभ राशीतच प्रवेश करणार आहेत. १९ मे ला वृषभ राशीत शुक्र गोचर करणार आहेत. ज्यामुळे ‘गजलक्ष्मी राजयोग’ निर्माण होत आहे. जो खूप शुभ मानण्यात येतो. वृषभ राशीमध्ये शुक्र आणि गुरुची युती १२ वर्षांनी होणार आहे. ही युती ११ जुनपर्यंत असणार आहे. त्यामुळे काही राशींना या शुभयोगाचा लाभ होणार आहे

मेष राशी
गजलक्ष्मी राजयोग बनल्याने मेष राशीच्या लोकांना बरेच फायदे मिळू शकतात. तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ खूप शुभ परिणाम देणारा ठरु शकतो. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. बिझनेसमध्ये पैसे गुंतवल्यास तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. यावेळी वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळू शकते. वैवाहिक जीवनातही आनंद मिळू शकतो.

Advertisement

कर्क राशी
कर्क राशीच्या लोकांना गजलक्ष्मी राजयोग बनल्याने अच्छे दिन अनुभवता येऊ शकतात. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी काळ फलदायी ठरु शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. आकस्मिक धन प्राप्त होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. पदोन्नती आणि पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली असू शकते. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे.

सिंह राशी
गजलक्ष्मी राजयोग बनल्याने सिंह राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. तुम्हाला रखडलेले पैसे मिळू शकतात आणि तुमच्या योजना यावेळी यशस्वी होऊ शकतात. मालमत्तेचे किंवा वाहनाचे सुख मिळू शकतं. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. या राशीच्या लोकांना कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवता येऊ शकतो


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!