टाटा समूहाने कार्य संस्कृतीची जोपासना केली


ज्येष्ठ अधिकारी माधव जोशी यांचे प्रतिपादन
सातारा
गेली दीडशे वर्षे भारतीय औद्योगिक संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या टाटा उद्योग समूहाने कार्यसंस्कृतीची जोपासना केली समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांच्यापासून रतन टाटा यांचापर्यंत सर्वांनीच या कार्य संस्कृतीचा आदर केल्यामुळे समूह जगात आदर्श ठरला असल्याचे प्रतिपादन टाटा टेली सर्विसेसचे माजी अध्यक्ष आणि सध्याचे कायदेशीर सल्लागार माधव जोशी यांनी केले
येथील नगर वाचनालयाच्या पाठक हॉल सभागृहामध्ये दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था,आम्ही पुस्तकप्रेमी समूह आणि सातारा नगर वाचनालय यांच्या विद्यमाने माधव जोशी यांचे टाटा एक विश्वास या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते
यावेळी व्यासपिठावर डॉ संदीप श्रोत्री,शिरीष चिटणीस,विनोद कुलकर्णी,श्रीराम नानल आणि अजित कुबेर उपस्थित होते
माधव जोशी म्हणाले, सर्वसामान्य भारतीयांच्या गरजा लक्षात घेऊनच त्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातूनच टाटा उद्योग समूहाने विविध उद्योगांमध्ये पदार्पण केले जमशेठजी टाटा यांचा विशाल दृष्टिकोनातून निर्माण झालेला हा उद्योग समूह दोराबजी टाटा,जेआरडी टाटा आणि रतन टाटा या सर्वांनी विस्तारित केला आज जगातील शंभर पेक्षा जास्त देशांमध्ये टाटा उद्योग समूहाचे अस्तित्व आहे
टाटा उद्योग समूहाचा विस्तार झाला कारण या समूहाने नेहमीच कामगारांना प्राधान्य दिले आणि कामगार कल्याणच्या विविध योजना राबवल्या म्हणूनच टाटा उद्योग समूहातील कार्य संस्कृती आदर्श मानली जाते असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले

Advertisement


जेआरडी टाटा यांच्यानंतर टाटा समूहाचे वारसदार बनलेल्या रतन टाटा यांनी टाटा उद्योग समूहाला मोठ्या उंचीवर नेऊन पोहोचवले चारित्र्य हीच संपत्ती या तत्त्वाद्वारे व्यवसाय करणाऱ्या रतन टाटा यांनी नेहमीच ग्राहक कल्याण आणि कामगार कल्याण याला प्राधान्य दिले असेही माधव जोशी यांनी सांगितले
टाटा समूहाचे नेतृत्व करणाऱ्या विविध प्रमुखांचे किस्से आणि कहाण्या सांगून माधव जोशी यांनी व्याख्यानात रंगात आणली यावेळी श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे प्रमुख डॉ संदीप श्रोत्री यांनी केले
आम्ही पुस्तकप्रेमी समूहाचे समन्वय श्रीराम नानल यांनी माधव जोशी यांचा परिचय करून दिला
दीपलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक शिरीष चिटणीस यांनी अध्यक्षीय भाषणात टाटा समूहाचे संपूर्ण चित्र डोळ्यासमोर मांडल्याबद्दल माधव जोशी यांचे आभार मानले ज्येष्ठ संपादक मुकुंद फडके यांनी आभार प्रदर्शन केले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैदेही कुलकर्णी यांनी केले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!