कास परिसरात पार्टीत राडा , 3 जखमी


बारबालांसह अश्लील डान्सचे व्हिडिओ व्हायरल
सातारा
सातारा जिल्ह्याचा मानबिंदू असलेल्या कास परिसरात एका हॉटेलवर नुकतीच पार्टी झाली. या पार्टीत बारबाला देखील नाचवल्या गेल्या आहेत.यावेळी झालेल्या राड्यात आणि मारामारीत ३ जण जखमी झाले आहेत
सध्या मोठ्या शहरांमध्ये रंगीत-संगीत पार्ट्यांचे पेव्ह फुटले आहे. अनेकदा पोलिसांकडून अशा पार्ट्यांवर छापा टाकून कारवाई केली जाते, तर कधी अशा पार्ट्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष देखील होते. त्यामुळे, महिला नाचवत किंवा बारबाला घेऊन काही ठिकाणी पार्ट्या केल्या जातात. सातारा जिल्ह्यातही अशाच एका पार्टीचा भांडाफोड झाला असून सोशल मीडियावर या पार्टीचे फोटो व्हायरल झाले आहेत. साताऱ्याच्या कास पठारावरील एका हॉटेलमध्ये बारबालांसह ही पार्टी रंगली होती. या पार्टीदरम्यान झालेल्या भांडणात 3 जण जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र, कुठलीही पोलीस कारवाई झाली नाही
ही पार्टी सुरू असतानाच अचानक काही प्रकार घडला. आणि त्याचे रुपांतर कोयते, तलवारी नाचवण्यात गेले. यामध्ये काही गाड्या फोडण्यात आल्या. तर तलवार कोयत्याने हाणामारी होवून काहींची डोकी फुटली तर काहींच्यावर कोयत्याने वार झाले.
अंमली पदार्थ आणि दारू पिवून झालेल्या भांडणात दारूच्या बाटल्यांचा वापर करण्यात आला. बाटल्या डोक्यात फोडण्याबरोबरच बाटल्यांची फेकाफेकी झाल्यामुळे हॉटेलच्या काचाही फुटल्या आहेत. या रेव्ह पार्टीचा आयोजक असणाऱ्या मच्छीबाज गुंडांनेच सोमवारी दुपारी झालेल्या नुकसानीची भरपाई दिल्याचे समजते. हॉटेलच्या फुटलेल्या काचांचे नुकसान भरुन देण्यात आले आहे.
एम. एच. 12 पासिंग असलेल्या दोन आर्टिगा गाड्यांमधुन आलेल्या 10 बारबाला या पुण्याच्या की पनवेलच्या यावरुनही साताऱ्यात गॉसिपिंग सुरू आहे.
या पार्टीत दारू पिऊन धिंगाणा घालतानाचे, बारबालांसोबत अश्लील नृत्य करतानाचे व्हिडिओ सध्या सोशलमिडियावर व्हायरल होत आहेत. महत्वाचे म्हणजे या पार्टीनंतर या ठिकाणी वाद होऊन राडा देखील झाला आहे. त्यामध्ये, तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. दरम्यान, याबाबत सातारा पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याशी संपर्क साधल्यानंतर प्रकरणाची चौकशी सुरू करत असल्याचे त्यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!