सचिन नायर करताहेत गोलंदाजांना मार्गदर्शन
एम. के.अकादमीतर्फे शाहू क्रीडा संकुल येथे उपक्रम
सातारा
एम. के.अकादमीतर्फे शाहू क्रीडा संकुल येथे आयोजित क्रिकेट प्रशिक्षण शिबिरात महाराष्ट्र आणि इंडिया ए संघाचे माजी खेळाडू आणि नामवंत प्रशिक्षक सचिन नायर हे जलदगती,फिरकी गोलंदाजांना मार्गदर्शन करत आहेत.
तीन दिवसांच्या या कालावधीत नायर हे गोलंदाजांना फिटनेस तसेच गोलंदाजी कशी करावी याच्या महत्वाच्या टिप्स देत आहेत. बी. सी. सी.आय,तसेच आय.सी.सी.चे अव्वल दर्जाचे कोच अशी त्यांची ख्याती असून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ सातारा येथील नवोदित क्रिकेटरना मिळणार आहे.
आज सकाळच्या सत्रात या प्रशिक्षणाचा शुभारंभ माजी पंच,पत्रकार शरद महाजनी यांच्या उपस्थितीत झाला.मयूर कांबळे,शेखर पवार, सय्यद,किरण बनसोडे,किरण जावळे, जावेद सय्यद, दीपक पोळ यावेळी उपस्थित होते.
सकाळी नऊ ते बारा,दुपारी चार ते सहा या वेळेत सुरू असलेल्या या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन कांबळे यांनी केले.
फोटो ओळ
प्रशिक्षक सचिन नायर यांच्यासोबत उदयोन्मुख खेळाडू.
फोटो ओळ
प्रशिक्षक सचिन नायर यांच्यासोबत उदयोन्मुख खेळाडू.