आम्ही पुस्तकप्रेमी समूहाचे रविवारी वार्षिक स्नेहसंमेलन


दिवसभरात विविध साहित्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन
सातारा
आम्ही पुस्तकप्रेमी समूहाचे द्वितीय वार्षिक स्नेह संमेलन रविवार दिनांक १७ नोव्हेंबर २०२४ सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत यवतेश्वर येथील हॉटेल निवांत येथे होणार आहे हे संमेलन फक्त आम्ही पुस्तकप्रेमी समूहाच्या सदस्यांसाठी खुले आहे ,अशी माहिती समूहप्रमुख डॉ संदीप श्रोत्री यांनी दिली
संमेलन स्थळाला दिवंगत डॉ शंतनू अभ्यंकर साहित्य नगरी असे नाव देण्यात आले असून प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक प्रख्यात स्त्री-वादी लेखिका डॉ सौ अश्विनी धोंगडे आहेत यावेळी विख्यात उद्योजक आणि लोकप्रिय लेखक शरद तांदळे उपस्थित राहणार आहेत
या संमेलनात प्रारंभी मराठी काव्यसरितेतील नवदुर्गा हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे त्यानंतर डॉ अश्विनी धोंगडे यांचे अर्धे आकाश या विषयावर भाषण होणार आहे
सकाळच्या सत्रात अभिजात दर्जा मिळाला, पुढे काय या विषयावर परिसंवाद होणार असून त्यामध्ये विनोद कुलकर्णी, शिरीष चिटणीस, श्रीकांत कात्रे, रेणूताई दांडेकर भाग घेणार आहेत
दुपारच्या सत्रात शरद तांदळे यांची मुलाखत सौ शुभदा जगताप आणि पद्माकर पाठकजी घेणार आहेत याशिवाय मनोगत, साहित्यविषयक किस्से कवी संमेलन आदी कार्यक्रम होणार आहेत


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!