आम्ही पुस्तकप्रेमी समूहतर्फे निबंध स्पर्धा


सातारा
सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर येथील आम्ही पुस्तकप्रेमी समूहातर्फे निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे
या स्पर्धेचा तपशील पुढीलप्रमाणे
इयत्ता ५ वी ते ७ वी –
विषय –
१. मी दिवाळी कशी साजरी केली?
२. मला आवडलेले पुस्तक
३..माझा सातारा, माझा अभिमान

इयत्ता ८ वी ते १० वी –
विषय –
१..मला आवडलेला मराठी साहित्यिक
२..अखिल भारतीय साहित्य संमेलन – एक साहित्यिक पर्वणी
३..माझे पहिले साहित्य संमेलन

महाविद्यालयीन गट –
विषय –
१..मराठी साहित्य आणि जागतिकीकरणाचे आव्हान
२.सातारा जिल्ह्यातील समृद्ध साहित्यिक वारसा
३..मराठी साहित्य आणि तरुण पिढी

खुला गट –
विषय –
१..शतकपूर्व अ भा मराठी साहित्य संमेलन- माझ्या अपेक्षा
२..मराठी भाषेचा ‘अभिजात’ दर्जा टिकवायचा कसा ?
३..साहित्य संमेलन- नवे लेखक – संधी कि आव्हान ?
४.. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि साहित्य निर्मितीचे आव्हान

Advertisement

स्पर्धेचे नियम
१..एक व्यक्ती एक निबंध
२..शालेय विद्यार्थी – शब्दमर्यादा – ६०० शब्द
३..महाविद्यालयीन विद्यार्थी – शब्द मर्यादा – १००० शब्द
४..खुला गट – शब्दमर्यादा – १२०० शब्द
५..निबंध हे स्वतःच्या अक्षरात असावेत, सुवाच्च्य आणि शुद्ध लेखनासाठी वेगळे बक्षीस आहे.
६..निबंध कागदाच्या एका बाजूस लिहिलेले असावेत.
एका पाकीटात घालून बंद करून द्यावेत.
७..शालेय विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत निबंध द्यावा
८.. खुल्या गटासाठी निबंध देण्याचे ठिकाण –
— डॉ संदीप श्रोत्री, दत्तकाशी हॉस्पिटल, सातारा
9822058583
— दीपलक्ष्मी पतसंस्था, कन्याशाळेमागे, देवी चौक, सातारा.7588865061
— श्रीराम नानल, कांगा कॉलनी, सातारा. 9423034050
सीमंतिनी नूलकर,
मिहिका, दौलत नगर, सातारा
9822323847

९..निबंध देण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०२५ आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!