कोरेगावमध्ये मतदान जनजागृती रॅली उत्साहात
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग
कोरेगाव
लक्षात ठेवा वीस नोव्हेंबर, जागरूक मतदार भारताचा आधार अशा घोषणा देत शेकडो अधिकारी कर्मचारी यांनी कोरेगाव शहरातून मतदान जनजागृतीसाठी रॅली काढली या पायी रॅलीला नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या रॅलीमध्ये अंगणवाडी सेविका आशा सेविका पंचायत समितीचे कर्मचारी अधिकारी आरोग्य खात्याचे अधिकारी कर्मचारी बांधकाम खात्याचे अधिकारी कर्मचारी महसूल खात्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते जनजागृती पथकाचे नोडल अधिकारी धनंजय चोपडे पथक प्रमुख यशेंद्र क्षीरसागर सदस्य मंगेश घाडगे हे देखील उपस्थित होते. रॅली काढण्या अगोदर प्रांत अधिकारी नवीन कार्यालयांमध्ये तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांच्या उपस्थितीत मतदान गीत तसेच मतदान प्रतिज्ञा देण्यात आली. कोरेगाव विधानसभा मतदारसंघ मध्ये जनजागृती पथकाद्वारे रांगोळी निबंध काव्य पोस्टर चित्रकला घोषवाक्य अशा विविध स्पर्धा तसेच व्याख्याने प्रभात फेरी गृहभेटी चित्ररथ इत्यादी माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे सोशल मीडियाचा देखील प्रभावी वापर केला जात आहे.सुदृढ आणि बळकट लोकशाहीसाठी तसेच भारताच्या उज्वल भवितव्यासाठी जास्तीत जास्त मतदान किंबहुना शंभर टक्के मतदान व्हावे यासाठी सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी अधिकारी प्रयत्नरत आहेत. गाव पातळीवर देखील विविध शासकीय अधिकारी कर्मचारी भेटी देऊन तसेच वैयक्तिक भेटीगाटीतून मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत सर्व नागरिकांनी 20 नोव्हेंबरला मतदान करावे आणि इतरांनाही प्रवृत्त करावे असे आवाहन नोडल अधिकारी श्री चोपडे यांनी केले.

