वासोटा किल्ला पर्यटनासाठी खुला


जलसफर व जंगल सफारीचा घेता येणार अनुभव

सातारा
राज्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आणि जिल्ह्याचे पर्यटन वैभव असलेल्या ऐतिहासिक वासोटा किल्ल्याचा ट्रेक शुक्रवारपासून सुरू झाला असून याचा पर्यटक मनमुरादपणे आनंद घेत आहेत.नैसर्गिक दुर्गमता लाभलेला वासोटा किल्ला पर्यटकांचे आकर्षण स्थान मानला जातो. शिवसागर ओलांडून कोयना अभयारण्यातून या किल्ल्यावर जावे लागते. निबीड जंगल, सदाहरित वृक्षराजी, अथांग जलाशयामुळे या परिसराला एक निराळे वैशिष्ट्य लाभले आहे.
वासोट्यावरुन दिसणारे उंचच उंच कडे अन् प्रचंड खोल दऱ्या मनात धडकी भरवतात. वासोटा पर्यटन सुरू झाल्यामुळे या भागातील मुनावळे, बामणोली शेंबडी, तापोळा, अंबवडे येथील येथील बोट क्लबच्या चालकांमध्ये तसेच स्थानिकांसह, तंबू व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
वासोट्याला जंगल ट्रेकिंगसाठी जाताना बामणोलीवरून किंवा मुनावळे, दत्त मंदिर या ठिकाणांहून बोटीने जावे लागते. त्‍यानंतर वासोट्याच्या पायथ्याला पोचल्यावर किल्ल्याच्या पायथ्याशी घनदाट जंगल असल्याने सूर्यकिरणे जमिनीपर्यंत पोचत नाहीत. त्‍यामुळे जमिनीची ओलही लवकर कमी होत नाही. त्यामुळे जळूचे प्रमाण जास्त असते. हा कीटक पायाला लागल्यावर रक्त पितो व पडून जातो; परंतु काही प्रमाणात हे कीटक विषारीही असू शकतात. जास्त प्रमाणावर रक्तस्राव झाल्यास जिवास धोका निर्माण होऊ शकतो. त्‍यामुळे वासोट्याला जाताना काळजी घेणे गरजेचे आहे

Advertisement

असे आहे वासोटा पर्यटन प्रवेश शुल्क

१०० रुपये प्रती व्यक्ती
१२ वर्षांच्या आत ५० रु.
गाईड २५० रुपये
बोट/वाहन शुल्क १५० रुपये
कॅमेरा शुल्क डीएसएलआर लेन्स कॅमेरा दर १०० रुपये,
साधा कॅमेरा, पॉईंट शूट कॅमेरा ५० रुपये


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!