फडणवीस यांचे सभांचे शतक


राजकीय मैदानात चौथ्या टप्प्यातच झळकावलं शतक

Advertisement

मुंबई :
लोकसभा निवडणूकातील चौथा टप्पा पार पडत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभांचं शतक झळकवलं आहे. पाचवा टप्पा अजून बाकी असतानाच फडणवीसांच्या रेकॉर्ड ब्रेक सभा भाजपसाठी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 100 सभांचा आकडा पूर्ण केला आहे, असं करणारे ते राज्यातील पहिल्या फळीतील नेत्यांपैकी एकमेव नेते आहेत. फडणवीसांनी महाराष्ट्रातच नव्हे तर केरळमध्ये ही एक सभा घेतली आहे. राज्यात 99 आणि केरळात 1 अशा 100 सभा त्यांनी घेतल्यात. भाजपने 400 पार जाण्याचा नारा दिला आहे. हे करताना घटक पक्षांच्या उमदेवारांची विजय निश्चिती महत्त्वाची आहे. यासाठी मोदी, शहांप्रमाणे फडणवीसांच्या सभेची ही मागणी वाढली होती. राज्यात लोकसभेचे 48 मतदारसंघ आहेत, यात फडणवीसांनी 130 हून अधिक सभा घेण्याचं नियोजन आखलं आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील तालुक्याच्या ठिकाणी या या सभा होणार आहेत. आकडेवारी पाहिली तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सरासरी 3 सभा फडणवीस घेत आहेत. सभांचा हा वाढता आकडा फडणवीस म्हणजेच विजय निश्चिती असं समीकरण प्रस्थापित करत असल्याचं बोललं जातं.
फडणवीसांनी आपली 100 वी सभा पुण्यात घेतली.
राज्यातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहचण्याच प्रयत्न फडणवीसांनी केला होता. त्यामुळे प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील सर्वच वर्गांमध्ये फडणवीसांबद्दलची सरकारात्मक भावना तयार झालीये, असं मत भाजप कार्यकर्ते व्यक्त करतायेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!