विशाल अग्रवालवर शाईफेक


वंदे मातरम संघटनेकडून आंदोलन
पुणे
कल्याणीनगर अपघात प्रकरणी अटक करण्यात आलेले अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांची आज पोलीस आय़ुक्तालयात पुन्हा चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात नेत असताना विशाल अग्रवाल यांच्यावर शाईफेक झाल्याची घटना घडलीय. वंदे मातरम संघटनेकडून ही शाईफेक करण्यात आली. अग्रवालला धडा शिकवण्यासाठी ही शाईफेक केल्याची माहिती वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिली. विशाल अग्रवालच्या मुलाने दोननिष्पाप जीव घेते, त्याच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी वंदे मातरम संघटनेने केलीय.

शाईफेकीच्या घटनेनंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. आंदोलकांनी आम्हाला कारवाईची भीती नाही पण जे दोन निष्पाप बळी गेलेत त्यांना न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी केली. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की, वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून अगरवालला धडा शिकवण्यासाठी ही शाईफेक केली. काळी शाई फासायला आलो होतं. त्याच्यावर हल्ला करायचा होता. त्याच्या मुलाने दोन निष्पाप जीव घेतले. त्यांच्या आई वडिलांना आयुष्यभर दुखात रहावं लागणार आहे.

Advertisement

अग्रवालवर आधीच गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. जेवढा तो मुलगा जबाबदार नाही तेवढा हा जबाबदार आहे. त्याने पोराला गाडी दिली हा त्याचा मोठा गुन्हा आहे. तसंच पबमध्ये जे दारू प्यायले होते त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. जर ते स्वत:च्या गाडीने गेले असतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजेच. पबवर गुन्हा दाखल व्हायला हवा. त्यांनी काटेकोरपणे कार्ड पाहून एन्ट्री दिली पाहिजे, वयोमानाची मर्यादा पाळली गेली पाहिजे. नाहीतर आम्ही खूप मोठं आंदोलन करू. महाराष्ट्रात अशा गोष्टी आम्ही सहन करणार नाही असा इशारासुद्धा कार्यकर्त्यांनी दिला.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!