सोमवारी साताऱ्यात चंद्र आहे साक्षीला गाण्यांचा कार्यक्रम
दीपलक्ष्मी पतसंस्था आणि आम्ही आनंदयात्रीतर्फे आयोजन
सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि आम्ही आनंद यात्री ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे चंद्र आहे साक्षीला हा कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने खास चंद्रगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
प्रमुख पाहुणे म्हणून शिल्पा चिटणीस, डॉक्टर मोहन सुखटणकर, ऍड अश्विनी झाड, ऍड अमोल चिकणे, मुकुंद फडके आणि मुकुंद पांडे उपस्थित राहणार आहेत यावेळी ऍड आशुतोष वाळिंबे, ऍड लक्ष्मीकांत अघोर,प्रशांत कुलकर्णी, अरुण कुलकर्णी, मुकुंद पांडे ,ऍड रेश्मा वाळिंबे प्रिया अघोर,विजया चव्हाण हे गायक कलाकार चंद्रगाणी सादर करणार आहेत कार्यक्रमाचे निवेदन ऍड स्नेहल कुलकर्णी करणार असून ध्वनी व्यवस्था सचिन शेवडे अक्षता शेवडे सांभाळणार आहेत
सर्वांनी या अनोख्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन दीपलक्ष्मी पतसंस्था आणि आम्ही आनंद यात्री ग्रुप यांच्यातर्फे करण्यात आले आहे

