खांडेकरांच्या लिखाणाला भारतीयत्वाचा स्पर्श
व्याख्यानामध्ये डॉक्टर सुनीलकुमार लवटे यांचे प्रतिपादन
सातारा
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक वि स खांडेकर यांच्या साहित्याने महाराष्ट्राच्या सीमा ओलांडल्या होत्या त्यांच्या साहित्याला भारतीयत्वाचा स्पर्श होता देशातील अनेक राज्यांमध्ये खांडेकर यांचे अनुवादित साहित्य लोकप्रिय होते असे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी केले
येथील नगर वाचनालयामध्ये आयोजित त्रिदिवशीय व्याख्यानमालेमध्ये वि स खांडेकर यांचे नव संपादित साहित्य या विषयावर व्याख्यानाचे दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते
सुनील कुमार लवटे यांनी संशोधन करून वि स खांडेकर यांचे अप्रकाशित साहित्य शोधले होते या व्यतिरिक्त वि स खांडेकर यांच्या काही जुन्या साहित्याचे नवसंपादनही डॉक्टर लवटे यांनी केले आहे याबाबत बोलताना डॉ लवटे म्हणाले,वि स खांडेकर यांनी एकूण 110 साहित्य रचना केला याव्यतिरिक्त त्यांनी अनेक चित्रपटांच्या पटकथाही लिहिल्या रूपककथा ही वि स खांडेकर यांनी मराठी साहित्याला दिलेली देणगी आहे देशातील अनेक प्रांतामधील प्रादेशिक भाषांमध्ये वि स खांडेकर यांच्या साहित्याचे भाषांतर झाले आहे वि स खांडेकर यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही साहित्यिकाच्या लेखनाचे एवढ्या मोठ्या प्रमाणात इतर भाषांमध्ये भाषांतर झालेले नाही
व्यवसायाने शिक्षक असलेल्या वि स खांडेकर यांनी लेखक म्हणूनसुद्धा समाज शिक्षकाचीच भूमिका घेतली स्वप्न आणि सत्य या दोन तत्त्वांवर आधारित साहित्यरचना करत असतानाच त्यांनी आधुनिक काळातील स्त्रीने खऱ्या अर्थाने स्वतंत्र कसे व्हावे याबाबत मार्गदर्शन करणारे लेखनही केले अशी माहितीही यावेळी सुनील कुमार लवटे यांनी दिली
यावेळी डॉ सुनीलकुमार लवटे यांनी रूपककथाकार , पटकथाकार , लघुनिबंधकार अशा विविधप्रकारे वि स खांडेकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा उलगडा करून दाखवला
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक संध्या चौगुले यांनी केले
या कार्यक्रमामध्ये दैनिक लोकमतच्या दीपोत्सव या दिवाळी अंकाचे प्रकाशनही करण्यात आले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैदही कुलकर्णी यांनी केले आभार प्रदर्शन शिरीष चिटणीस यांनी केले

