डॉ राजा दीक्षित यांच्या कवितासंग्रहाचे गुरुवारी लोकार्पण
सातारा
इतिहासाचे जेष्ठ अभ्यासक, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि नवभारतचे माजी संपादक डॉ राजा दीक्षित यांनी लिहिलेल्या कुरबॅश आणि इतर कविता या कवितासंग्रहाचे लोकार्पण गुरुवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता दीपलक्ष्मी सांस्कृति सभागृहामध्ये होणार आहे पुणे येथील संवेदना प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचे लोकार्पण ज्येष्ठ साहित्यिक किशोर बेडकीहाळ यांच्या हस्ते व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे
यावेळी स्वप्नील पोरे, प्रा देवानंद सोनटक्के शिल्पा चिटणीस हे मान्यवर या कवितासंग्रहावर भाष्य करणार असून यावेळी संवेदना प्रकाशनाचे नितीन हिरवे आणि पुणे येथील साहित्यदीप प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर उपस्थित राहणार आहेत सर्वांनी या लोकार्पण समारंभाला उपस्थित रहावे असे आवाहन दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शिरिष चिटणीस यांनी केले आहे

