विनोद कुलकर्णी यांचा शुक्रवारी सत्कार
आम्ही पुस्तकप्रेमी समूह आणि दीपलक्ष्मी पतसंस्थेचा पुढाकार
सातारा
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कोषाध्यक्ष आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी दिल्लीत आंदोलन करीत सातारकरांचा ठसा उमटवलेले श्री विनोद कुलकर्णी यांची महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यावर सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सातारकरांच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे आम्ही पुस्तक प्रेमी समूह व दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्या पुढाकाराने या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असून शुक्रवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल शनिवार पेठ येथे हा सत्कार समारंभ होणार आहे
कुपर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडचे चीफ ह्यूमन रीसोर्स ऑफिसर नितीन देशपांडे यांच्या हस्ते विनोद कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात येणार आहे या सत्कार समारंभाला सातारकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिरीष चिटणीस डॉ संदीप श्रोत्री ,श्रीराम नानल आणि सहकाऱ्यानी केले आहे

