आलिया भट्ट,साक्षी मलिक,सत्या नडेला प्रभावशाली


टाईम टॉप 100 च्या लिस्टमध्ये समावेश

मुंबई :
प्रतिष्ठित मासिक टाईमच्या 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी समोर आली आहे. या 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये जगभरात विविध क्षेत्रात नाव कमावणाऱ्या भारतीय व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.
यात जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा, बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्या नडेला, ऑलिम्पियन कुस्तीपटू साक्षी मलिक आणि अभिनेता-दिग्दर्शक देव पटेल यांचा समावेश आहे.
टाईमच्या 2024 च्या 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये यूएस डिपार्टमेंट ऑफ एनर्जीच्या लोन प्रोग्राम ऑफिसचे संचालक जिगर शाह, येल विद्यापीठातील खगोलशास्त्र आणि भौतिकशास्त्राचे प्राध्यापक प्रियमवदा नटराजन, भारतीय वंशाच्या रेस्टॉरंट मालक अस्मा खान यांचा समावेश आहे. लीडर ॲलेक्सी नवलनी, युलिया नवलनाया यांचाही समावेश आहे.

Advertisement

आलिया भट्टचं वर्णन या मासिकात ‘अविश्वसनीय प्रतिभा’ म्हणून केलं आहे. आलिया भट्टविषयी दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक टॉम हार्पर यांनी टाइम प्रोफाइलमध्ये लिहिलंय की ‘आलिया केवळ भारतीय चित्रपट सृष्टितील आघडीची तसंच जगभरात नाव कमावणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक असुन, ती एक उत्तम व्यावसायिक देखील आहे.’ असं म्हणत तिचं कौतुक केलं आहे.

तर सत्या नडेला यांच्याबद्दल लिहिलंय की, ‘ते आपलं उज्वल भविष्य घडवण्यासाठी काम करत आहेत. ही मानवतेसाठी चांगली गोष्ट आहे.’ तसंच ते पुढे म्हणाले ‘ओपनएआय’मध्ये मायक्रोसॉफ्टची गुंतवणूक आणि ‘मिस्ट्रल एआय’ सोबतच्या करारामुळे एआयच्या क्रांतीत सत्या नडेला यांचा मोठा वाटा आहे. सत्या AI ला मानवांना सक्षम बनवणारे साधन म्हणून पाहतात. त्यांची कल्पनाशक्ती आणि विनम्रता आपल्या सर्वाना एका सुरक्षित ठिकाणी पोहचवेल.’ असं त्यांनी म्हटलं आहे.

साक्षी मलिकविषयी लिहिण्यात आलंय की, ‘साक्षी भारतातील ‘सर्वाधिक चर्चेत’ कुस्तीपटूंपैकी एक आहे, तिने ब्रिजभूषण शरण सिंह ज्यांच्यावर महिला खेळाडूंच्या लैंगिक छळाचा आरोप आहे त्यांच्याविरुद्ध 2023 च्या सुरुवातीला दिल्लीतील जंतरमंतर इथं आंदोलन केलं होतं.’ असं म्हणत या ऑस्करविजेत्या खेळाडूचं कौतुक करण्यात आलं आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!