अमेरिकेतले 18,000 भारतीय अडचणीत
मायदेशी परत पाठवलं जाण्याची भीती
वॉशिंग्टन
आपण राष्ट्राध्यक्ष झालो तर दुसऱ्या देशांतून अमेरिकेत येणाऱ्यांसाठीचे नियम कठोर करू असं डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचारादरम्यान वारंवार बोलून दाखवलं होतं. त्यामुळे आता तब्बल 18,000 भारतीयांवर अमेरिकेतून परत पाठवलं जाण्याची टांगती तलवार आहे.
दुसऱ्या देशांमधून येऊन विविध कारणांच्या आधारे अमेरिकेत स्थायिक होणाऱ्यांचा मुद्दा अमेरिकेच्या यावेळच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत गाजला.याबद्दल आपण कठोर भूमिका घेऊ, आजवरची सर्वात मोठी मास डिपोर्टेशन प्रोग्राम म्हणजे लोकांना अमेरिकेतून त्यांच्या देशात परत पाठवून देण्याची मोहीम आपण राबवू, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे अमेरिकेच्या इमिग्रेशन अँड कस्टम इनफोर्समेंटने अशा साडे चौदा लाख लोकांची यादी जाहीर केली आहे.त्यांच्यावर डिपोर्टेशनची म्हणजे अमेरिकेतून त्यांच्या मूळ देशी परत पाठवलं जाण्याची कारवाई करण्यात येणार आहे. आणि यामध्ये तब्बल 18,000 भारतीय आहेत.
अमेरिकेत वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळा व्हिसा घ्यावा लागतो. शिक्षणासाठी – F1 व्हिसा संशोधनासाठी, नोकरीसाठी – H1B व्हिसा (जो काम करण्यासाठीचा तात्पुरता परवाना)तिथे राहणाऱ्यांचे पती-पत्नी-जोडीदार किंवा मुलं – H4 व्हिसा विद्यार्थी म्हणून गेलेल्यांना तिथेच नोकरी मिळाली तर H1B व्हिसासाठी अर्ज करावा लागतो. आणि H1B व्हिसा मिळाल्यावर आणखी काही अटी आणि प्रक्रिया पूर्ण केल्यावर कर्मचारी ग्रीन कार्डसाठी अर्ज करू शकतात.

