युनिव्हर्सल नाॅलेज स्कूलमध्ये सीपीआर कार्यक्रम


आपत्कालीन स्थितीमध्ये प्राण वाचवण्याचे प्रात्यक्षिक

Advertisement

सातारा
युनिव्हर्सल नाॅलेज स्कूल,वर्ये,सातारा येथे सीपीआर (Cardiopulmonary resuscitation) या कार्यसत्राचे आयोजन करण्यात आले.यावेळी डाॅ मेघना देशमुख मयुरेश माने,डाॅ.सर्वेश्वर कोरे या मान्यवरांनी आपली प्रमुख उपस्थिती दर्शविली.यावेळी डाॅ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात झाली.सीपीआर प्रक्रियेद्वारे आपात्कालीन स्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीचे प्राण कसे वाचवू शकतो ? याचे प्रयोग प्रात्यक्षिकांद्वारे दाखवण्यात आले.विविध पद्धतींमधून नैसर्गिक श्वसनप्रक्रिया, कृत्रिम श्वसनप्रक्रिया,ह्रदयाची स्पंदन सुस्थितीत आणण्याची प्रक्रिया या सर्वांचे प्रात्यक्षिक प्रमुख पाहुण्याकडून दाखवण्यात आले.यावेळी इयत्ता सातवी ते दहावीचे विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.तसेच या सत्रात इयत्ता आठवीतील विद्यार्थी मयुरेश जाधव याने सूत्रसंचालन केले तर इयत्ता सातवीतील विद्यार्थीनी अवंतिका काटकर हिने आभार प्रदर्शन केले.यावेळी शाळेच्या उपप्राचार्या सौ.रोशनी चंदनखेडे,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
शाळेचे चेअरमन श्री.नितीन माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!