घरातील 8 जणांची हत्या


आई-वडील,पत्नी-मुलगा आणि भावाला संपवून केली आत्महत्या

Advertisement

छिंंदवाडा
एकाच कुटुंबातील ८ जणांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्यानंतर कुटुंब प्रमुखाने आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात हि घटना घडली आदिवासी कुटुंबातील तरुणाने आई-वडील, पत्नी, मुलगा आणि भावाची हत्या केली. कुटुंबातील ८ जणांची हत्या केल्यानतंर स्वत: गळफास घेत जीवन संपवलं. मध्यरात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आलीय. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण गाव सील करण्यात आलं आहे.
हत्या झालेल्यांमध्ये पत्नी आणि आरोपीच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. आरोपीने भावाच्या एका मुलावरही वार केले पण तो कसाबसा तिथून निसटला आणि याची माहिती पोलिसांना दिली. हत्येनंतर घरातील परिस्थिती भयंकर अशी होती. सर्व मृतदेह घरात वेगेवगळ्या ठिकाणी होते. घरात आणि घराबाहेर अंगणात झोपलेल्या आपल्याच नातेवाईकांची निर्घृण हत्या केल्याने छिंदवाडामध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला मानसिक आजार होता. त्याला व्यसन होतं की नव्हतं याची चौकशी केली जात आहे. मध्यरात्री तीन वाजता झोपेतच त्याने आई-वडील, पत्नी आणि तीन चिमुकल्यांची हत्या केली. सर्वांचे मृतदेह अंथरुणात रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पत्नीसोबत वाद झाल्यानं त्याने हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!