अजय देवगणने मागवले 11 हजार वडापाव


गिनीज बुकमध्ये झाली विक्रमाची नोंद

Advertisement

मुंबई
‘सिंघम अगेन’ च्या टीमने स्विगीच्या मदतीने वडापावची सर्वात मोठी ऑर्डर दिली . या ऑर्डरची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. अजय देवगण रोहित शेट्टी आणि स्विगीने रॉबिन हुड आर्मीच्या मुलांसाठी तब्बल 11000 वडापावची डिलिव्हरी मागवली होती.रॉबिन हूड आर्मी ही एक एनजीओ आहे जी मुंबईत अनेक ठिकाणी अन्न वाटप करून भुकेविरुद्ध लढा देत आहे.
अजय देवगण, रोहित शेट्टी आणि स्विगी यांनी 11,000 वडा पाव डिलिव्हर केले. विलेपार्ले येथे एअरपोर्ट हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज होते जिथे अजय देवगण, रोहित शेट्टी आणि स्विगीचे सह-संस्थापक फणी किशन यांना ऑर्डर मिळाली आणि एकाच ऑर्डरमध्ये सर्वाधिक वडा पाव देण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. वांद्रे, जुहू, अंधेरी पूर्व (चांदिवली आणि चकला), मालाड आणि बोरिवली येथील रॉबिन हूड आर्मी समर्थित शाळांमध्ये वडा पावाचे वाटप करण्यात आले. या विक्रमाबद्दल बोलताना रोहित शेट्टी म्हणाले, “आम्ही या वडापावकरता स्विगीसोबत रेकॉर्ड ब्रेक नोंद केली आहे. या वडापावच्या मदतीने मुलांना आनंद आणि जेवण दिल्याचा आनंद आहे. सिंघमच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे ही नोंद अतिशय विक्रमी आहे.”


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!