चकमकीत 8 नक्षलवादी ठार
गडचिरोलीत पोलिसांची मोठी कारवाई
नागपूर
नक्षलग्रस्त गडचिरोलीमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नारायणपूर जिल्ह्यामधील अबुझमाडच्या सीमावर्ती भागातील रेकाव्याच्या जंगलात कालपासून पोलीस आणि नक्षलींमध्ये चकमक सुरू होती. अखेर आज पोलिसांना या चकमकीत मोठे यश आले आहे. चकमकीत पोलिसांनी 8 नक्षलवाद्यांना खात्मा केला आहे. या संयुक्त ऑपरेशनमध्ये दंतेवाडा, नारायणपूर आणि बस्तर या तीन जिल्ह्यातील पोलीस सहभागी झाले होते. पोलिसांनी सापळा रचून संपूर्ण परिसराला वेढा घातला होता. त्यामुळे नक्षलवाद्यांची चांगलीच कोंडी झाली. डीआरजी, बस्तर फायटर आणि एसटीएफच्या एकूण 800 जवानांनी जंगलात लपून बसलेल्या नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.
