निवडणूक काळात रात्री एटीएम व्हॅनवर बंदी


केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी

Advertisement

मुंबई
तसेच, निवडणूक काळात काही निर्बंध घालण्यात येणार असून एटीएमसाठी पैशांचा पुरवठा करणाऱ्या व्हॅनला वेळेचे बंधन असणार आहे. तसेच, याकाळात अँब्युलन्स, बँक आणि पतसंस्था यावर देखील लक्ष ठेवलं जाईल, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी दिली
केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या 2 दिवसांत राज्यातील राजकीय पक्ष व विविध संस्थांशी चर्चा करुन विधानसभा निवडणुकांसाठीचा आढावा घेतला आहे. त्यानंतर, आज पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठीची महत्वाची माहिती दिली. राज्यातील मतदारांची संख्या, पुरुष, महिला, तृतीयपंथी मतदार आणि मतदारांमध्ये झालेल्या वाढीसंदर्भात माहिती दिली
एटीएमसाठी पैसै घेऊन जाणाऱ्या गाडीला निवडणुक काळात रात्री 6 ते सकाळीं 8 पर्यंत पैसे वाहतूक करता येणारं नाही. याकाळात अँब्युलन्स, बँक आणि पतसंस्थांवर देखील लक्ष ठेवलं जाईल.
राज्यात एकूण 288 विधानसभा मतदारसंघांत निवडणूक होत आहे. त्यासाठी, राज्यात पुरुष मतदार 4. 95 कोटी आणि स्त्री मतदार 4.64 कोटी आहेत, थर्ड जेंडर म्हणजेच तृतीयपंथी मतदारांची संख्या 5997 असून राज्यातील दिव्यांग मतदार 6.32 लाख एवढे आहेत. यंदा पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवयुवकांची संख्या म्हणजे नव मतदार 19.48 लाख एवढे आहेत. राज्यांत महिला मतदारांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून 10.77 लाख मतदार आहेत.
राज्यांत एकूण पोलिंग स्टेशन 1 लाख 186 असणार आहेत.
शहरातील मतदान बुथ केंद्रांची संख्या 42 हजार 585, तर ग्रामीण महाराष्ट्रात 57 हजार 601 मतदान बुथ केंद्र असणार आहेत. काही ठिकाणीं तरूण अधिकारी बूथ मँनेज करतील. 350 असे बूथ असतील जिथे तरुण अधिकारी बूथ मॅनेज करतील.लोकसभा निवडणुकीत कमी मतदान क्षेत्र असेलल्या कुलाबा, कल्याण, कुर्ला, मुंबादेवी इथ मतदान कमी झालं आहे. गडचिरोली येथे 73 टक्के मतदान झालं, मग कुलाबा कल्याण येथे मतदानाचा टक्का वाढायला हवा. इथल्या मतदारांनी विचार करायला हवा,असेही निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.
निवडणूक आयोगाच्यावतीने सुविधा पोर्टल नावाने अॅप जारी करण्यात आलं आहे. या एप्लिकेशन्सवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. एखाद्या ठिकाणीं काही घटना घडली किंवा उशीरापर्यंत मतदान सुरु असेल तर केवळ फोटो काढून या एप्लिकेशन्सवर अपलोड केला की, 90 मिनिटांत निवडणुक आयोगाची टीम तिथं पोहचेल, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!