सज्जनगडाजवळ कार दरीत कोसळली


खड्डा चुकवताना अपघात,पुण्यातील पाच जण जखमी

Advertisement

सातारा
ठोसेघर येथे पर्यटनासाठी गेलेल्या पुण्यातील पर्यटकांची गाडी ठोसेघर हून साताऱ्याकडे येत असताना रस्त्यावरील खड्डा चुकवताना दरीत कोसळून पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुण्यातील काही पर्यटक काल गुरुवारी ( दि. २६ ) ठोसेघर येथे फिरण्यासाठी आले होते. आज सकाळी ठोसेघर येथून पुण्याकडे परत जाताना सज्जनगड फाटा जवळ खड्डा चुकविताना या गाडीला अपघात झाला.
या अपघातात पाच जखमी झाले आहेत. पर्यटकांची गाडी ही सज्जनगड फाट्यावरून दरीत कोसळली. यामुळे पर्यटक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!