शाळेच्या प्रगतीसाठी विद्यार्थ्याचा नरबळी


उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये मानवतेला काळिमा फासणारी घटना

Advertisement

लखनौ
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये गेल्या रविवारी निवासी शाळेच्या प्रगतीसाठी शाळा व्यवस्थापक शिक्षक व त्याच्या तांत्रिक वडिलांनी इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांचा नरबळी दिला.ही घटना उघड झाल्यावर गुरुवारी पोलिसांनी या प्रकरणी आरोपी व्यवस्थापक शिक्षक, त्याचे तांत्रिक वडिलांसह पाच जणांना अटक केली.
कोतवाली साहपाऊ भागातील रासगनवा गावात चालणाऱ्या डीएल पब्लिक स्कूल या निवासी शाळेतील ११ वर्षीय कृतार्थ कुशवाह रहिवासी तुरसैन याचा गळा दाबून खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिस निरीक्षक सदाबाद हिमांशू माथूर यांनी सांगितले की, शाळेच्या व्यवस्थापकाचे वडील जशोधन सिंग. दिनेश बघेल हे तांत्रिक विधी करतात. वडिलांसह शाळेच्या व्यवस्थापकाने शाळेच्या प्रगतीसाठी मुलाचा बळी देण्याचा कट आखला. गेल्या रविवारी रात्री शाळेच्या आतील हॉलमध्ये झोपलेल्या कृतार्थ या विद्यार्थ्यांचा गळा आवळून बळी देण्यात आला. यानंतर व्यवस्थापक आपल्या गाडीतून विद्यार्थ्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणार होते. कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुलाचा मृतदेह शाळा व्यवस्थापकाच्या गाडीत सापडला.
मुलाच्या हत्येनंतर शाळेच्या व्यवस्थापनाने मुलाच्या घरी फोन करून कृतार्थ आजारी असल्याची माहिती दिली. यानंतर कुटुंबीय शाळेत पोहोचले असता त्यांना कृतार्थ सापडला नाही. वसतिगृह संचालक दिनेश बघेल यांना विद्यार्थ्यांच्या उपचाराबद्दल विचारले असता त्यांनी त्यांची दिशाभूल केली. कृतार्थला उपचारासाठी घेऊन गेल्याचे ते सांगत राहिले. काही वेळाने या लोकांनी दिनेश बघेलला त्याच्या कारसह सादाबादजवळ पकडले.
यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांना कृतार्थचा मृतदेह मागच्या सीटवर पडलेला आढळून आला. यानंतर पोलिसांनी मृताचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. यात विद्यार्थ्याची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅनेजरचे वडील जशोधन भगत असून ते तंत्र विद्या करायचे. या तंत्रमंत्र आणि त्यागामुळे त्यांनी विद्यार्थी कृतार्थची हत्या केली. तंत्र-मंत्राचा वापर करून मुलाचा बळी दिल्यास आपली शाळा आणि व्यवसाय चांगला होईल, अशी अशा असल्याने व्यवस्थापक दिनेश बघेल आणि त्याचे वडील जशोधन यांनी कृतार्थचा बळी दिला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!