२७ ऑक्टोबर रोजी चारुदत्त आफळे यांचा सावरकर गीतांचा कार्यक्रम
नियोजनासाठी रविवारी अखिल ब्राह्मण महासंघातर्फे बैठकीचे आयोजन
सातारा
अखिल ब्राह्मण महासंघ सातारा यांच्यातर्फे रविवार दिनांक 27ऑक्टोबर रोजी दुपारी 4:00 ते 06:00 या वेळेमध्ये शाहू कला मंदिर येथे थोर स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या जीवन प्रवासावर आधारित राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे प्रस्तुत ” सागरा प्राण तळमळला हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी आणि अधिक माहिती देण्यासाठी रविवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4:30 वाजता अखिल ब्राह्मण महासंघ अध्यक्ष धनंजय कुलकर्णी,रांगोळी कॉलनी शाहूपुरी सातारा, यांचे निवासस्थानी बैठक आयोजित केलेली आहे. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सर्व सावरकर प्रेमींनी या बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे
अखिल ब्राह्मण महासंघ ही शासन नोंदणीकृत संस्था अनेक समाज उपयोगी उपक्रम सातत्याने करत आलेली आहे. सहभागाने आणि अथक परिश्रमाच्या याच वर्षी परशुराम जयंती शाहू कला मंदिर सातारा येथे साजरी करण्यात आली होती. सामूहिक गुरुचरित्र ग्रंथ पारायण, वधू वर सूचक मेळावा, सामूहिक मौजी बंधन कार्यक्रम इत्यादी संस्थेमार्फत राबवले जातात

