गुरूवारी मोहम्मद रफी यांच्यावर विशेष कार्यक्रम


दीपलक्ष्मी पतसंस्था आणि आम्ही आनंद यात्रीतर्फे आयोजन

सातारा

Advertisement

दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि आम्ही आनंद यात्री ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 31 जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी यांनी गायलेल्या गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे
31 जुलै हा मोहम्मद रफी यांचा स्मृतिदिन असून त्या निमित्ताने तुम मुझे यु भुला ना पाओगे या शीर्षका खाली या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे संगीत सृष्टीतील आधुनिक तानसेन म्हणून ओळख असलेल्या मोहम्मद रफी यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीमध्ये हजारो गाणी गाऊन आजही रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे अशाच काही निवडक गाण्यांचे सादरीकरण यावेळी होणार आहे या कार्यक्रमाची संकल्पना शिरीष चिटणीस यांची असून दिग्दर्शन मुकुंद पांडे यांनी केले आहे कार्यक्रमाचे निवेदन ऍड स्नेहल कुलकर्णी करणार आहेत या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ममता नरहरी, ऍड सीमंतिनी नुलकर, मुकुंद फडके,शिरिष चिटणीस,मुकुंद पांडे उपस्थित राहणार आहेत. यावेळी आम्ही आनंद यात्री ग्रुपचे मुकुंद पांडे,अनंत जोशी, ऍड लक्ष्मीकांत अघोर,प्रशांत कुलकर्णी ,अरुण कुलकर्णी, आशुतोष देशपांडे वैशाली चंद्रसाली,प्रिया अघोर, विजया चव्हाण, मधु गिजरे हे कलाकार गाणी सादर करणार आहेत कार्यक्रमाची ध्वनी व्यवस्था सुभाष कुंभार यांची असणार आहे कार्यक्रमाचा आनंद रसिकांनी घ्यावा असे आवाहन शिरिष चिटणीस आणि मुकुंद पांडे यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!