शरद पवारांनी मराठा समाजाला अडचणीत आणले


मनोज जरांगे यांचा प्रथमच पवारांवर निशाणा
नाशिक
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आता थेट शरद पवार यांच्यावरच खळबळजनक आरोप केला आहे. पवारांनी मराठा समाजाला अडचणीत टाकल्याचे सांगून त्यांच्यामुळेच आजवर मराठ्यांना आरक्षण मिळू शकलेले नाही असे त्यांनी म्हटले आहे आतापर्यंत राष्ट्रवादीचे अजित पवार मंत्री छगन भुजबळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अन्य नेत्यांवर मनोज जरांगे पाटील यांनी सातत्याने निशाणा साधला आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार हे मनोज जरांगे यांना भडकवत असल्याचे बोलले जात होते. मात्र मनोज जरांगे यांनी आता शरद पवार यांच्यावरच निशाणा साधला आहे
नाशिकमध्ये मराठा समाजाच्या शांतता रॅलीची सांगता झाल्यानंतर अंतरवली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. राज्यात 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही, असे शरद पवार यांनी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांना सांगितले होते. त्यामुळे या समस्येत आपण काहीही करू शकत नाही.
मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून माझ्या कोणत्याही अपेक्षा नाहीत. कारण त्यांनी आरक्षण न देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारला मराठा आणि ओबीसी समाजात संघर्ष निर्माण करायचा आहे.आम्ही त्यांना मराठ्यांची ताकद दाखवून देऊ, थोडा धीर धरा. आम्ही सरकारला 29 तारखेपर्यंत वेळ दिला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!