बिग बॉस मराठी 70 दिवसांचाच


मेगा फायनल होणार ६ ऑक्टोबरला

मुंबई
मागील चार सीझन 100 दिवसचालणार बिग बॉस मराठी शो पाचव्या सीझनमध्ये मात्र फक्त 70 दिवसांचाच असणार असल्याची चर्चा मागील अनेक दिवासंपासून सुरु होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे कलर्स चॅनलच्या वरिष्ठ अधिकारी सुगंधा लोणीकर यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली.
सुगंधा लोणीकर म्हणाल्या,बिग बॉस 70 दिवसांतच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. हा अचानक घेतलेला निर्णय याची कल्पना कुणालाच नव्हती. त्याचप्रमाणे कार्यक्रम इतक्या लवकर संपवण्याचं कारणही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.बिग बॉस मराठी सीझन 5ची फायनल 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

Advertisement

बिग बॉसच्या घरात सध्या वर्षा उसगांवकर, पंढरीनाथ कांबळे, धनंजय पोवार, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर हे स्पर्धक राहिले आहेत. त्यामुळे आता यापैकी कोण फायनलचं तिकीट मिळवणार आणि कुणाला घरची वाट दाखवली जाणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!