पुण्यात हॉटेलमध्ये ड्रग्जविक्री
एफसी रोडवरील नामांकित हॉटेलमधील व्हिडीओ व्हायरल
पुणे
पुण्यातील एफसी रोडवरील एका नामांकित नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री होत असल्याचं समोर आले असून या हॉटेलमधील व्हिडीओ व्हायरल झालाय. व्हिडीओमध्ये मुलं नशा करत असल्याचं दिसतेय.अनेक अल्पवयीन मुलांना दारू दिली जात असल्याचेही समोर आलेय. पुण्यातील एफसी रोडवरील हॉटेल, पबमध्ये तरुण-तरुणी एन्जॉयमेंटसाठी येथे येतात, ते ड्रग्ज घेत असल्याचा व्हिडीओ समोर आलेय. मॅफेनड्रग्स असल्याचं प्राथमिक माहितीमधून समोर आलेय.
या प्रकरणाचा पाठपुरावा मी गेल्या काही दिवसांपासून घेत आहे. पोलीस आणि इतरांशी माझं पत्रव्यवहार आणि बोलणं झालं. पोलीस पथकातील काही अधिकार्यांमुळे या घटना घडत आहेत. पोलिसांना पैसे देऊन हा प्रकार होत आहे. यावर कायमचा उपाय शोधायला हवा. तसा कायदा तयार करायला हवा.
पोलिसांना पैसे देऊन काही प्रकऱणं मिटवली जातात. पुन्हा तेच सुरु होतं. कायदा आहे, पण पोलिस त्याचा वापर करत नाहीत, पैशांचा हप्ता घेऊन सर्व काही सुरु आहे, असा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला.
तब्बल आठ ते नऊ महिन्यापासून पुण्यातल्या ड्रग्ज प्रकरणावर सातत्याने भूमिका मांडतेय. त्याही वेळेला जेव्हा कोट्यवधींचे ड्रग्जचे साठे आढळायला लागले, तेव्हाही आम्ही शंभुराजे देसाई आणि गृहमंत्र्यांना प्रश्न विचारले. पण शंभूराज देसाई आरेरावीने बोलतात, त्यांना मला खास प्रश्न विचारायचाय, हप्ता भरपूर मिळाला की आम्ही तरुणांच्या जीवनशी सुद्धा त्यांना खेळायचे. या सगळ्या प्रकरणांमध्ये शंभूराजे यांनी तात्काळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. त्याशिवाय शंभूराजे देसाई यांच्यासाठी फक्त काम करणारे राजपूत यांचं निलंबन झालं पाहिजे. या दोन गोष्टी झाल्याशिवाय पुणे सुधारू शकत नाही. महाराष्ट्रातील ड्रग्जचा विळखा त्याशिवाय नष्ट होऊ शकत नाही. त्यामुळे माझी मागणी आहे की शंभूराजेंनी राजीनामा द्यावा आणि एक्साइस अधिकारी राजपूत यांचं निलंबन व्हावं.
याप्रकरणी आम्ही पोलिस आणि आमच्या खात्यासंदर्भात चौकशी करु.कल्याणीनगर प्रकरणानंतर आम्ही सर्व हॉटेल आणि पब यांच्यावर कारवाई केली आहे. आतापर्यत जवळपास 60 जणांवर कारवाई केली. हा व्हिडीओ कुठल्या भागातील आहे, त्याची आम्ही चौकशी करणार आहे. 49 बार आणि पब बंद केलेली अजून सुरु केलेली नाहीत, असे शंभूराज देसाई म्हणाले. याप्रकरणाची गंभीर दखल घेण्यात येईल, ज्या परिसरातील हॉटेलमध्ये हे घडलेय त्याबाबत कसून चौकशी करण्यात येईल, असेही देसाई यांनी सांगितले
