ट्रॅव्हिस हेडच्या बॅटचा पुन्हा धुमाकूळ
ऑस्ट्रेलियाची इंग्लंडवर 7 गडी राखून मत
लंडन
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील 5 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ट्रेंट ब्रिज येथे खेळला गेला. या सामन्यात ट्रॅव्हिस हेडने 154 धावांची नाबाद खेळी खेळली, ज्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 7 विकेट राखून पराभव केला.जोस बटलरच्या अनुपस्थितीत कर्णधार असलेल्या हॅरी ब्रूकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ 49.4 षटकांत सर्वबाद झाला. यादरम्यान संघाने 316 धावांचे लक्ष्य ठेवले, ज्याचा ऑस्ट्रेलियाने 6 षटके राखून पाठलाग केला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आणि सलग 13 एकदिवसीय सामनेही जिंकले.
ट्रॅव्हिस हेडने गेल्या दीड वर्षांपासून आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांना चकित केले आहे. अवघ्या 129 चेंडूत 154 धावांची झंझावाती खेळी करत त्याने इंग्लंडचे 316 धावांचे आव्हान सोपे केले. यादरम्यान 20 चौकार आणि 5 षटकारही मारले. गोलंदाजीतही त्याने इंग्लंडला अडचणीत आणले. हेडने पहिल्या डावात 4.4 षटकात 34 धावांत 2 बळी घेतले.
हेडने या सामन्यात कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले आणि एक विक्रमही आपल्या नावावर केला. इंग्लंडविरुद्ध वनडेमध्ये दोनदा 150 हून अधिक धावा करणारा हेड पहिला फलंदाज ठरला आहे. दुसरीकडे, मार्नस लाबुशेनने 61 चेंडूत 77 धावांची खेळी करत हेडला पूर्ण साथ दिली. लाबुशेनने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला पुनरागमन करण्यास मदत केली. त्याने 6 षटकात 39 धावा देत 3 बळी घेतले. यात बेन डकेट आणि कर्णधार हॅरी ब्रूकच्या महत्त्वाच्या विकेट्सचाही समावेश होता.316 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने 20 धावांवर कर्णधार मिचेल मार्शची विकेट गमावली. यानंतर हेडने स्टीव्ह स्मिथसह दुसऱ्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी करत डाव सांभाळला. पण स्मिथ 96 धावांवर बाद झाला. हेडने कॅमेरून ग्रीनच्या साथीने डाव पुन्हा रुळावर आणला आणि तिसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी केली. त्यानंतर ग्रीनही बाद झाला.
यानंतर मार्नस लाबुशेन क्रीजवर आला. यावेळी हेडने चौथ्या विकेटसाठी 148 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. लाबुशेनने 61 चेंडूत 77 धावांचे योगदान दिले. अशाप्रकारे, या दोघांनी संयुक्तपणे ऑस्ट्रेलियासाठी चौथ्या सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग केला.