दीपलक्ष्मी सभागृहात सोमवारपासून पुस्तक प्रदर्शन


२५ ते ४० टक्के सवलतीत पुस्तके उपलब्ध

Advertisement

सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, मर्या.,सातारा आणि पुस्तक पर्व ग्रंथ भांडार यांच्या संयुक्त विद्यमाने दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे
सोमवार दि.2३ सप्टेंबर ते शुक्रवार दि.२७ सप्टेंबर 2024 या कालावधीत पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे प्रदर्शनाचे उदघाटन सोमवार दिनांक 2३ सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजता श्रीराम नानल आणि ज्येष्ठ पत्रकार-लेखक मुकुंद फडके यांच्याहस्ते आणि शिरीष चिटणीस व इतर मान्यवर व्यक्तींच्या उपस्थित संपन्न होणार आहे,अशी माहिती दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक- अध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी दिली
या पुस्तक प्रदर्शनात मान्यवर प्रकाशन संस्थेची वेगवेगळ्या विषयावरची पुस्तके दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असून या प्रदर्शनात पुण्यातील दिलीपराज प्रकाशन पुणे, उत्कर्ष प्रकाशन, चपराक प्रकाशन, अक्षरबंध प्रकाशन,अमित प्रकाशन, साहित्यअक्षर प्रकाशन, समकालीन प्रकाशन व इतर प्रकाशकांच्या पुस्तकांसह अन्य प्रकाशनांची लोकप्रिय तसेच दुर्मिळ पुस्तके 25 ते 40 टक्के सवलतीत सातारकर वाचक ,ग्रंथप्रेमींसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. या ग्रंथ प्रदर्शनात विविध विषयांवरील पुस्तकांचा समावेश आहे. पाच हजाराहून अधिक पुस्तके प्रदर्शनात मांडण्यात येणार असल्याने सातारकरांसाठी ही मोठी सुवर्ण संधी ठरणार आहे. सकाळी दहा ते रात्री आठ,अशी प्रदर्शनाची वेळ आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रंथालयांनी या पुस्तक प्रदर्शनास संपर्क साधून 40% पर्यंत सवलत मिळून पुस्तके खरेदी करावे तसेच सातारच्या समस्त पुस्तक प्रेमी, ग्रंथप्रेमी,वाचकांनी पुस्तक प्रकाशनाच्या व प्रदर्शनाचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!