कांचन गंगेच्या कुशीत पुस्तकाचा शनिवारी लोकार्पण समारंभ
मिलिंद गुणाजी, श्रीनिवास पाटील यांची उपस्थिती
सातारा
डॉ. संदीप श्रोत्री यांनी लिहिलेल्या आणि मुंबईच्या हेडविक मीडिया हाऊसने प्रकाशित केलेल्या कांचनगंगेच्या कुशीत या पुस्तकाचा लोकार्पण समारंभ शनिवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:30 वाजता इंडियन मेडिकल असोसिएशनच्या हॉलमध्ये होणार आहे
आम्ही पुस्तक प्रेमी समूह आणि रानवाटा निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन मंडळ सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने या लोकार्पण समारंभाचे आयोजन करण्यात आले असून हे लोकार्पण ज्येष्ठ अभिनेते निसर्गप्रेमी लेखक आणि छायाचित्रकार मिलिंद गुणाजी आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते होणार आहे
यावेळी विचारवंत डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते गिर्यारोहक आशिष माने उपस्थित राहणार आहेत
जगातील तिसऱ्या सर्वोच्च शिखराच्या सभोवताली असणाऱ्या जैवविविधतेने नटलेल्या निसर्गरम्य प्रदेशामध्ये डॉक्टर संदीप श्रोत्री यांनी केलेली डोळस भटकंती या पुस्तकात रेखाटण्यात आली आहे
या लोकार्पण समारंभाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्यवाह शिरीष चिटणीस, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, रानवाटाचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील आणि समन्वयक जयंत देशपांडे आणि आम्ही पुस्तक प्रेमीसमूह यांनी केले आहे
यावेळी डॉक्टर संदीप श्रोत्री यांचा कांचनगंगा भटकंतीवरील स्लाईड शो सादर केला जाणार आहे

