श्री भगवान परशुराम जन्मोत्सव साजरा
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ सातारा यांच्या वतीने आयोजन
सातारा
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ सातारा यांच्या वतीने संगम माहुली येथील भगवान परशुराम मंदिरात श्री भगवान परशुराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पाटण येथील सौ. निशा फाटक यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. त्यानंतर सूर्यास्त वेळी अग्निहोत्र आणि जन्मकाळ पार पडला. कार्यक्रमाची सांगता प्रसाद आणि पन्हे वाटपाने झाली. या कार्यक्रमास अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हा तसेच शहर पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संघ्येने उपस्थित होते.

