मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या


इमारतीवरून उडी मारून संपवलं जीवन

Advertisement

मुंबई
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी वांद्रे इथं इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.आलमेडा पार्क इथल्या इमारतीच्या ६ व्या मजल्यावरून उडी मारून अनिल अरोरा यांनी जीवन संपवलं.अरोरा यांनी बुधवारी सकाळी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली.अनिल अरोरा आणि जॉयस पॉलीकार्प यांचा जवळपास चाळीस वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. त्यावेळी मलायका अवघ्या ११ वर्षांची होती. घटस्फोटानंतर मलायका आणि तिची लहान बहीण अमृता या दोघीही आईसोबत राहत होत्या.एका मुलाखतीत मलायका अरोराने वडिलांबद्दल बोलताना सांगितलं होतं की, माझे आई-बाबा मी ११ वर्षांचे असताना वेगळे झाले. माझं बालपण खूप सुंदर होतं पण ते सोपं नव्हतं. ते दोघे वेगळे झाल्यानं आईकडे पाहण्याचा वेगळा आणि नवा दृष्टिकोन मिळाला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!