पास करण्यासाठी हायकोर्टात धाव


पाचवीत नापास केल्याने विद्यार्थ्याने उचलले पाऊल

नवी दिल्ली :
एखाद्या वर्गात नापास झालं की काही मुलांचं पूर्ण वर्ष वाया जातं. पण आता पुढच्या वर्गात जाण्यासाठी एका मुलाने थेट उच्च न्यायलयात धाव घेतल्याची घटना समोर आली आहे.हे प्रकरण दिल्लीमधील आहे. यात एका शाळेनं पाचवीच्या वर्गातील मुलाला नापास केलं आणि त्याला सहावीच्या वर्गात पाठवण्यास नकार दिला. त्यानंतर या 10 वर्षाच्या मुलाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली.या मुलाच्या हक्काच्या या लढ्यात त्याला त्याच्या पालक आणि वकिलांनीही साथ दिली. शेवटी त्याने ही लढाई जिंकली. हे प्रकरण अलकनंदा येथील एका खासगी शाळेशी संबंधित आहे. 2023-24 मध्ये एका 10 वर्षाच्या मुलाने पाचवी वर्गाची परीक्षा दिली. परंतु शाळेनं निकाल जाहीर न करता 15 दिवसांत 6 मार्च आणि 18 मार्च रोजी दोनदा परीक्षा घेतली. या परीक्षेत मुलाला नापास केलं आणि पुढच्या वर्गात पाठवण्यास नकार दिला. याविरोधात विद्यार्थ्याने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हे शिक्षण कायद्याच्या कलम 16 (3) चे उल्लंघन असल्याचे तो म्हणाला.

Advertisement

मुलाच्या वडिलांनी दाखल केलेली याचिका स्वीकारताना न्यायमूर्ती सी हरीशंकर यांच्या खंडपीठाने सांगितलं की, संतुलनाचं तत्त्व मुलाच्या बाजूने आहे. त्याला बढती मिळाली नाही तर त्याच्या शिक्षणावर परिणाम होईल. ज्याची भरपाई होऊ शकत नाही. शाळेने त्याला सहाव्या वर्गात बसण्याची परवानगी दिली तर त्याचा शाळेवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. मुलाने आरोप केला की शाळेनं त्याच्यावर अन्याय केला आहे. यामुळे शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन झाले आहे.

या प्रकरणावर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने खासगी शाळा आणि शिक्षण संचालनालयाला चार आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 जुलै रोजी होणार आहे. कोर्टात याचिका करणाऱ्या मुलाचं म्हणणं आहे, की शाळेनं त्याला तो फेल झाल्याची माहिती दिली नाही. याशिवाय त्याला परीक्षेसाठी दोन महिन्यांचा वेळही द्यायला हवा होता. जेणेकरून तो परीक्षेची तयारी करू शकेल. मात्र, दोन महिन्यांत केव्हाही परीक्षा घेणार, असं शाळेचं म्हणणं होतं


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!