युनिव्हर्सलच्या विद्यार्थ्यांचा नृत्यकला सादरीकरणात द्वितीय क्रमांक
सातारा
देशाच्या ७७ व्या वर्षपूर्तीच्या स्वतंत्रतादिनाचे औचित्य साधत ‘रोटरी क्लब सातारा’ यांच्यामार्फत आयोजित ‘रिदम ऑफ फ्रीडम’ या आंतरशालेय स्पर्धेत इयत्ता पाचवी ते दहावी वयोगटातील देशभक्तीपरक ‘गायन आणि नृत्याविष्कार’ स्पर्धेत युनिव्हर्सल नाॅलेज स्कूलमधील विद्यार्थीनींच्या समूहाने द्वितीय क्रमांक पटकावला.शाळेचे चेअरमन श्री.नितीन माने यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेसाठी शाळेतील विद्यार्थ्यांना नृत्य शिक्षक श्री.अभिषेक विटेवर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्कूलचे चेअरमन श्री.नितीन माने,उपप्राचार्या सौ.रोशनी चंदनखेडे,नृत्य शिक्षक श्री.अभिषेक विटेवर,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
