तृप्ती जाधव हिला शिष्यवृत्ती प्रदान
परदेशात एम एस्सीसाठी निवड झाल्याबद्दल सन्मान
सातारा
रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च वर्ये सातारा येथे पदवी घेतल्यानंतर पद्वुतर शिक्षणासाठी परदेशात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इन्स्टिट्युटचे माजी विद्यार्थी अशिराज एज्युकेशन ओवरसिस कन्सल्टंटचे संचालक अमोल ऊनऊने यांनी प्राचार्य बापूसाहेब उनउने यांच्या स्मरणार्थ रू. पन्नास हजार स्कॉलरशिप देणार असल्याचे जाहीर केले होते त्याप्रमाणे आज इन्स्टिट्यूटची बीबीए या पदवीच्या अंतिम वर्षाची विद्यार्थ्यांनी कु. तृप्ती सतीश जाधव हिची एम.एस्सी इन इंटरनॅशनल बिझनेस या पदवीत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी ऑक्सफर्ड ब्रोकीस युनिव्हर्सिटी लंडन येथे निवड झाल्याबद्दल तिला पन्नास हजार रुपयाचा धनादेश व स्मृतिचिन्ह देऊन रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी इन्स्टिट्युटचे संचालक डॉ. बी . एस . सावंत, डॉ सारंग भोला, डॉ राजेंद्र कुंभार, डॉ शिवराज निकम, प्राचार्य सतीश जाधव, अमोल ऊनऊने, सौ आशा सांळुके आदी उपस्थित होते. अमोल ऊनऊने यांचा सत्कार विकास देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.

