करंजखोपच्या विकासात अशोकराव धुमाळ यांचे योगदान मोलाचे


अमृत महोत्सवानिमित्त पूर्वजांच्या कार्याचाही गौरव

सातारा
सुसंस्कृत ,संयमी स्वभावाच्या अशोकराव धुमाळ यांनी सर्वांशी समन्वय साधत करंजखोप आणि परिसराच्या विकासासाठी दिलेले योगदान मोलाचे असून ते विसरले जाणार नाही अशा शब्दात अनेक मान्यवरांनी आज धुमाळ कुटुंबीय आणि त्यांच्या पूर्वजांच्या कार्याचा गौरव केला.
कोरेगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोकराव काका धुमाळ यांच्या अमृत महोत्सवानिमित्त करंजखोप येथील सुमन गार्डन येथे स्नेह मेळावा झाला. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि अशोकराव काकांचे आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मेळाव्यात अनेक मान्यवरांनी अशोकराव काकांच्या पूर्वजांनी करंजखोप आणि परिसराच्या समृद्धीसाठी विकासासाठी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. प्रा. डॉ.अश्विनी घोरपडे -गजेंद्रगडकर ,माजी आयुक्त विश्वासराव धुमाळ ,ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव देशमुख, डॉ. लालासाहेब शिंदे, बाळासाहेब सोळसकर ,संदीप चव्हाण, प्रा.शीला जाधव ,डॉ. नीता देशमुख अदिती धुमाळ, हणमंतराव सोळसकर, सतीश धुमाळ ,विलास जगताप आदींची यावेळी भाषणे झाली.
सत्काराला उत्तर देताना अशोकराव धुमाळ म्हणाले, आपल्याकडून होत असलेल्या या सन्मानाचा मी कृतज्ञतेने स्वीकार करतो. इथून पुढच्या काळातही मी माझ्या गावासाठी – परिसराच्या विकासासाठी योग्य ते प्रयत्न करून या समृध्दीत आणखी भर घालेन .
सुरुवातीला अशोकराव काका आणि सौ शर्मिला धुमाळ यांचे औक्षण करून अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी अनेकांनी व्यक्तिशः भेटून अशोकराव काकांवर शुभेच्छांचा वर्षाव केला.
सुरुवातीला दत्तात्रय वाघ यांनी वेदोक्त मंत्रांचे उच्चारण केले. सचिन धुमाळ यांनी स्वागत केले. उदयसिंह बापू धुमाळ यांनी प्रास्ताविक केले. धैर्यशील धुमाळ यांनी आभार मानले. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले
कार्यक्रमास संभाजीराव धुमाळ, दत्तात्रय धुमाळ, रामभाऊ लेंभे, सुरेशराव साळुंखे, चंद्रकांत फडतरे संग्राम सोळसकर, सतीश धुमाळ, संभाजी शिंदे ,विजय चव्हाण ,अमरसिंह फडतरे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते

Advertisement

अशोकराव धुमाळ यांचे स्नेही ज्येष्ठ उद्योजक लालासाहेब शिंदे यांनी कदंब रोप भेट देऊन अशोकराव काकांच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 वृक्षांची लागवड करण्यात येत असल्याचे जाहीर करून अशोकराव काकांना अनोखी भेट दिली .

 

छायाचित्र ओळ
कोरेगाव तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोकराव धुमाळ यांच्या अमृत महोत्सवानिमित्त करंजखोप येथे झालेल्या स्नेहमेळाव्यात अशोकराव काका आणि सौ. शर्मिला धुमाळ यांच्या सत्कार प्रसंगी सचिन धुमाळ, माजी सनदी अधिकारी विश्वासराव धुमाळ, ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव देशमुख उदयसिंह धुमाळ, धैर्यशील (शेखर )धुमाळ आदी.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!