मधुसूर राज्यस्तरीय आंतरशालेय सुगम संगीत स्पर्धा
सर्व गटातील विजेत्यांची संपूर्ण यादी
सातारा
स्व. नानासाहेब द्रविड यांचे स्मरणार्थ मधुसूर राज्यस्तरीय आंतरशालेय सुगम संगीत स्पर्धा शाहू कला मंदिरात उत्साहात पार पडली. स्पर्धेमध्ये ६० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. कोल्हापूर, पुणे, सांगली, विटा, वाई, कराड, पुणे आदी शहरांमधून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उदघाटन मा.खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि मा. आ. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या शुभहस्ते झाले. स्पर्धेचे परीक्षण बाळासाहेब चव्हाण अनंत नेरकर आणि ज्ञानेश्वर कल्याणकर यांनी केले. बक्षीस समारंभ सुप्रसिद्ध अभिनेते विजय निकम आणि ऍड विकास पाटील विहेकर अध्यक्ष सातारा जिल्हा बार असोसिएशन सातारा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
बालगटातील विजेते :
प्रथम : शुभ्रा खाडे, मनपा टेम्बलाइवाडी क्र 33, कोल्हापूर, सातवी
द्वितीय : कौंडिण्य कांबळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, देशमुखनगर, सहावी
तृतीय : अनन्या होंकण, कलमाडी शामराव हायस्कुल पुणे, पाचवी
उत्तेजनार्थ प्रथम : अंतरा लोटेकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कूस बुद्रुक, सातारा, सातवी
उत्तेजनार्थ द्वितीय : विहिका शहा, पोदार इंटरनॅशनल स्कूल सातारा, चौथी
उत्तेजनार्थ तृतीय : रिमा चव्हाण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसूर, चौथी
कुमारगटातील विजेते :
प्रथम क्रमांक : संस्कृती आवळे, रणजित कौर गडोख प्रशाला अतीत, आठवी
द्वितीय : भक्ती साळुंखे, रामकृष्ण विद्या मंदिर नागठाणे, दहावी
तृतीय : श्रीजा भडंगे, महाराजा सयाजीराव हायस्कुल, सातारा, नववी
उत्तेजनार्थ प्रथम : मधुरा मोहिते, आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल, सातारा, दहावी
उत्तेजनार्थ द्वितीय : यथार्थ कांबळे, आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल, सातारा, दहावी
उत्तेजनार्थ तृतीय: अर्चित साने, सरस्वती विद्यालय, कोरेगाव, नववी
स्पर्धेला श्रीरंग काटेकर, प्रशांत कुलकर्णी, सौ कुलकर्णी, संकेत पुराणिक, मुकुंद लांडगे, गणेश धावडे, निलेश देशपांडे, आदिती कासार, कविता अभ्यंकर, जयंत सहस्त्रबुद्धे, अजित सहस्त्रबुद्धे, प्राजक्ता भिडे, उदय जगताप, धनंजय माने, सचिन मोहिते, सुभाष कुंभार, स्वप्नजा बर्वे, ऍड सीए राजगोपाल द्रविड, हेमा द्रविड आदींनी परिश्रम घेतले. आयोजक ऍड अमित द्रविड यांनी आभार मानले.
