जनवाचक चळवळीतर्फे “पुस्तके ‘वाटप
२६ ऑगस्ट रोजी परळी हायस्कूल येथे कार्यक्रम
सातारा
श्री छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज परळी येथे सोमवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी जनवाचक चळवळीतर्फे पुस्तक वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अग्रणी बँक अधिकारी( निवृत्त) श्रीराम नानल हे गेली दहा वर्ष जनवाचक चळवळीच्या अंतर्गत ग्रामीण भागातील वाचनालयांना तसेच शाळांना पुस्तके वितरित करण्याची चळवळ करीत आहेत.
जावली तालुक्यातील डोंगरदऱ्यातील गावांना आतापर्यंत सुमारे पंधराशे पुस्तके ही देणगी स्वरूपात वितरित करण्यात आली आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, वाचनातून आपली बुद्धिमत्ता प्रगल्भ व्हावी या उद्देशाने श्रीराम नानल हे कार्य करीत आहेत. विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत अभ्यासाबद्दल वाचन संस्कृती जोपासली पाहिजे. विविध पुस्तके वाचल्याने आपल्या ज्ञानात भर पडते. यामुळे वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी श्रीराम नानल यांनी ही चळवळ उभारली आहे.
सौ.संध्या पवार यांच्या शुभहस्ते पुस्तक वितरण कार्यक्रम होणार आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्राचार्य अशोक कदम हे भूषवणार आहेत यावेळी प्रमुख उपस्थिती श्रीराम नानल, पत्रकार सोमनाथ राऊत ,परळीचे सरपंच, माजी विद्यार्थी संघाचे प्रतिनिधी, परळी पंचक्रोशीतील वाचक प्रेमी, मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत यावेळी ज्यांच्याकडे वाचनीय पुस्तके असतील अशांनी आपली पुस्तके शाळेत वितरित करण्यासाठी घेऊन येण्याचे आवाहन कार्यक्रमाच्या आयोजकांनी केले आहे.
