प्रा.डॉ.श्रीकांत तारे यांचे सोमवारी व्यख्यान


दीपलक्ष्मी पतसंस्था आयोजित “मी असा घडलो” कार्यक्रम
सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सातारा आयोजित गेल्या तीस वर्षात साहित्य क्षेत्रात मुशाफिरी करीत असतां आलेल्या अनुभवावर सादरकर्ते प्रा.डॉ.श्रीकांत तारे,जळगाव यांचा भन्नाट व्याख्यान कार्यक्रम “मी असा घडलो ” दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल 759 अ शनिवार पेठसातारा येथे सोमवार दि.26 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 3.00 वाजताआयोजित केला आहे.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.राजेंद्र माने,सुरेखा शेजवळ, डॉ. सुनील पटवर्धन,
शिरीष चिटणीस मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या व्याख्यान कार्यक्रमास सर्व सातारकर रसिक श्रोत्यांनी यावे असे आवाहनसंस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले यांनी केले आहे.
प्रा. डॉ.श्रीकांत तारे हे प्राध्यापक म्हणून शासकीय इंजीनियरिंग महाविद्यालय जळगांव येथे कार्यरत आहेत.
त्यांचे शिक्षण एम टेक,पी.एच.डी झाले असून त्यांचे अनेक अंतर्राष्ट्रीय जर्नल्स मधून अकरा शोधपत्रे प्रकाशित झाले आहेत.
त्यांचे एकूण ३३२ कथा व लेख प्रकाशित झाले असून दोन भाषांतरीत कादंबऱ्या प्रकाशित झाले आहेत.
त्यांची अनेक नियतकालिकांतून सुमारे १५० कविता व गीतं प्रकाशित झाली आहेत
भगवान देवकर निर्देशित ‘वेडा पिसा’ व श्याम फुलवाडे निर्देशित ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ चित्रपटांसाठी संवाद लेखन तसेच ‘वेडा पिसा’ चित्रपटासाठी गीत लेखन केले आहे.
तारेवरची कसरत’ या कथाकथनाचे तसेच ‘मी असा घडलो’ या एकल कार्यक्रमाचे एकूण २२५ अधिक प्रयोग केले आहेत.
त्यांनी सिंगापूर येथील विश्व मराठी साहित्य संमेलनात निमंत्रितांच्या कवी संमेलनांत सहभाग नोंदवला होता.
गोव्याच्या पोंडा येथे बृहनमहाराष्ट्र अधिवेशना दरम्यान, बृहनमहाराष्ट्र मंडळ.नवी दिल्लीतर्फे मराठी साहित्यातील उल्लेखनीय कामगिरीकरता ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!