युनिव्हर्सल नाॅलेज स्कूलमध्ये ‘स्वातंत्र्य दिन’ उत्साहात साजरा
सातारा
युनिव्हर्सल नाॅलेज स्कूल,वर्ये,सातारा येथे ७८वा ‘स्वातंत्र्य दिन’ शाळेचे चेअरमन श्री.नितीन माने यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरा झाला.यावेळी एच.डी.एफ.सी बँकेच्या सातारा शाखेचे मॅनेजर श्री.विक्रम घाटगे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली.त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.कार्यक्रमादरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषण तसेच समूह नृत्याचे सादरीकरण केले.प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणाद्वारे ‘विकसनशील भारत व अभ्यासातील सातत्य’ व ‘गुरूमहात्म्य’ या विषयांवर मौलिक विचारांचे मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमासाठी सिद्धार्थ पवार व वीरा सुतार या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले.शाळेच्या उपप्राचार्या सौ. रोशनी चंदनखेडे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत सर्वांचे आभार मानले.आयुष काळे या विद्यार्थ्याने आभार प्रदर्शन केले.यावेळी शाळेच्या व्यवस्थापक सौ.नवनिता पटेल,उपप्राचार्या सौ.रोशनी चंदनखेडे,शिक्षक,पालकवर्ग,शिक्षकेतर कर्मचारी वर्ग,वाहन कर्मचारी इ. उपस्थित होते.
