प्रेयसीचा खून करून तरुणाची आत्महत्या


पुण्यातील हडपसर भागातील धक्कादायक प्रकार
पुणे
पुण्यातील हडपसर भागातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नातेवाईकांनी प्रेमाला विरोध केल्यानं प्रियकराने प्रेयसीचा खून केला आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली आहे. मोनिका कैलास खंडारे असे खून झालेल्या तरुणीचे नाव तर आकाश अरुण खंडारे आत्महत्या केल्याचे नाव आहे.
मोनिका आणि आकाश मूळचे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्याचे. दोघे नातेवाईक असून, त्याचे प्रेमसंबंध होते. मोनिका आणि आकाशच्या प्रेमसंबंधाला कुटुंबीयांचा विरोध होता. आकाश शेती करायचा तर मोनिका नोकरी करत होती. दोघेही गावाहून पुण्यात पळून आले होते पुण्यात स्पॉटलाईट हॉटेलमध्ये दोघांनी खोली भाड्याने घेतली होती. मध्यरात्री आकाशने मोनिकाचा चादरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने खोलीतील पंख्याला चादर बांधून गळफास घेतला. दोघे जण मृतावस्थेत सापडल्याची माहिती हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर असा हा प्रकार उघडकीस आला अधिक तपास हडपसर पोलिसांकडून सुरू आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!