पंढरीचा विठुराया तिरंग्यात


स्वातंत्र्य दिनानिमित्त विठ्ठल मंदिरात खास सजावट

Advertisement

पंढरपूर
आज देशभरस्वातंत्र्य दिनाचा (Independence Day) जल्लोष
साजरा होताना दिसत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे.करोडो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढपूरच्या विठुरायाचं मंदिर देखील तिरंग्यानं सजलं आहे. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तीन रंगांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
आज मंदिर समितीने विठ्ठल मंदिरास तीन रंगांच्या फुलांची आकर्षक आरास केली आहे. विठुराया देखील या स्वातंत्र्याच्या रंगात रंगून गेला आहे. आज विठ्ठल मंदिराला पांढऱ्या तांबड्या आणि हिरव्या रंगांच्या फुलांनी सजवण्यात आलं आहे. विठ्ठल मंदिर प्रवेशद्वार सोळखांबी, नामदेव महाद्वार अशा विविध ठिकाणी या तिरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!