उल्का वर्षावाची पर्वणी


जागतिक वसुंधरा दिनी आकाशप्रेमींना संधी

Advertisement

मुंबई
रणरणत्या उन्हाचा ताप कमी करण्यासाठी रात्रीच्या वेळी ग्रह-तारे आपल्या सोबतीला येऊन काहीसा दिलासा देतात.अशाच प्रकारचा विविधरंगी प्रकाश उत्सव अर्थात उल्का वर्षाव २१ व २२ एप्रिल या जागतिक वसुंधरा दिनी होणार आहे.हा उल्का वर्षाव पूर्व आकाशात नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे.
उल्का स्वरूपात तूटणाऱ्या ताऱ्यांचा हा प्रकाश नजारा दरताशी सुमारे २० या प्रमाणात रात्री ११ नंतर पूर्व क्षितिजावर सुरू होऊन पहाटे आकाश मध्याशी असताना त्यांचा वेग वाढलेला असेल. पश्चिमेस चंद्रास्त झाल्याने या अनोख्या खगोलीय घटनेचा आनंद अधिक चांगल्या प्रकारे अनुभवता येईल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!