बीबीए,बीसीए प्रवेश सीईटी निकाल १७ जुनला


सातारा

Advertisement

यूजीसी आणि एआयसीटीई यांच्या निर्देशानुसार शैक्षणिक वर्ष २४- २५ पासून बीबीए, बीसीए या अभ्यासक्रमाला व्यवसायिक पदवी दर्जा मिळाल्यामुळे इंजिनिअरींग पदवी प्रवेशाप्रमाणे बारावी पास असलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाची राज्य सामाईक प्रवेश कक्षामार्फत बीबीए व बीसीए या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी प्रवेश परीक्षा दिली आहे या सीईटी परिक्षेचा निकाल १७ जुन २०२४ रोजी जाहीर होणार आहे असे प्रवेश परीक्षाकक्षाने जाहीर केले आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी सदर सीईटी परीक्षा दिलेली नाही परंतु त्यांना बीसीए बीबीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी आपला ऑनलाईन चौकशी प्रवेश फॉर्म www.kbpimsr.ac.in या संकेतस्थळावर भरावा आणि https://forms.gle/nhfpt45cG8YJfzJd8 हा गुगल फार्म भरावा किंवा इन्स्टिट्यूटच्या प्रवेश कक्षामध्ये येऊन फॉर्म भरावा असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे वर्ये येथील कर्मवीर भाऊराव पाटील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ.बी.एस.सावंत यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!