जी पॅट परीक्षेत गौरीशंकर लिंब फार्मसी विद्यार्थ्यांचे यश.
तीन विद्यार्थी गुणवत्तेत चमकले,महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर.
सातारा
राज्य व राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या विविध शैक्षणिक परीक्षेत नेहमीच उत्तुंग कामगिरी करणाऱ्या गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त केले आहे यामध्ये बी फार्मसी अंतिम वर्षातील प्रथमेश जयवंत मोरे, दिपाली अशोक नावडकर, ऋतुजा सोपान चव्हाण या विद्यार्थ्यांनी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (एन बी इ एम एस) द्वारा फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय नवी दिल्ली) यांनी शैक्षणिक वर्ष सन 2023-24 मध्ये घेण्यात आलेल्या जी पॅट परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवून संस्थेच्या शैक्षणिक शिरपेचात त्यांनी एक मानाचा तुरा रोवला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे नुकतेच महाविद्यालयात गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र बुके व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ योगेश गुरव, डॉ संतोष बेल्हेकर, डॉ भूषण पवार, डॉ धैर्यशील घाडगे, जी पॅट समन्वयक प्रा. सायली दळवी, प्रबंधक निलेश पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले यश कौतुकास्पद असून या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. येथील प्राध्यापकांचे अनमोल लाभलेले अचूक मार्गदर्शन त्यांच्या उत्कर्षाला उपयुक्त ठरले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ योगेश गुरव म्हणाले की, स्पर्धात्मक युगात विद्यार्थी परिपूर्ण ज्ञान आणि घडवण्यासाठी महाविद्यालय स्तरावर विविध उपक्रमातून त्यांच्या बौद्धिकतेला चालना देण्यात येते. जी पॅट परीक्षेत विद्यार्थ्यांचे यश हे महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे. यावेळी जी पॅट परीक्षेत यशस्वी झालेले प्रथमेश मोरे, दिपाली नावडकर, ऋतुजा चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक डॉ अनिरुद्ध जगताप, जयवंतराव साळुंखे, आप्पा राजगे, प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार संजय देशमाने यांनी केले.
जी पॅट परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना औषध निर्माण शास्त्र शाखेतील उच्च शिक्षण घेण्यासाठी (एम. फार्मसी) शासन स्तरावर या विद्यार्थ्यांना दरमहा 12 हजार 400 रुपये दोन वर्षासाठी शिष्यवृत्ती दिले जाते. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अद्ययावत प्रयोगशाळेत नाविन्यपूर्ण संशोधनासाठी संधी दिली जाते आजवर गौरीशंकर लिंब फार्मसीच्या असंख्य विद्यार्थ्यांना ही संधी मिळाली आहे.
फोटो ओळ
जी पॅट परीक्षेत यशस्वी विद्यार्थी प्रथमेश मोरे याचा सत्कार करताना श्रीरंग काटेकर समवेत डॉ. योगेश गुरव, डॉ. संतोष बेल्हेकर, डॉ. भूषण पवार
